सिल्लोड ( औरंगाबाद ), दि. 10 : सिल्लोड- अजिंठा रोडवर पालोदजवळ रस्त्यातील वळणावर कार व बाईक चा भीषण अपघात झाला. यात बाईक स्वार जागीच ठार झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. अपघातात रस्त्याच्या बाजूला गेलेल्या कारने ( एमएच 21 एएक्स 2386) पेट घेतला. प्रसंगावधान राखून त्यातील प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला.
अजिंठा रोडवरील पालोदजवळ रस्ता वळणाचा आहे, येथेच हा अपघात झाला आहे. मृत बाईकस्वाराचे नाव फ़ुलचंद चिंतामण पाटिल असे असून ते चाळीसगाव येथील ओझर चे रहिवासी होते. पाटील लिहाखेडी येथील मुर्डेश्वर हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते.
कारचा स्टेरिंग रॉड तूटल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघातानंतर कारने पेट घेतल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.