औरंगाबाद : मागील आठवडाभरात अन्न व औषध प्रशासनाने शहरात भेसळयुक्त खवा, सुगंधी सुपारी, गुटखा, असा एकूण २५ लाख रुपयांचा माल पकडला. गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात हा अवैध माल खाजगी ट्रॅव्हल्सद्वारे शहरात आणला जात आहे. सणासुदीच्या दिवसांत खव्याची मोठी मागणी असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी येथे गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात खवा आणला जातो. दूध उत्पादक आघाडीचे राज्य म्हणून गुजरातचा उल्लेख केला जातो; पण याच राज्यात भेसळयुक्त खवा बनविणाऱ्या फॅक्टऱ्या सुरू झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर गुटखा, सुगंधी तंबाखूही तेथूनच अवैधरीत्या महाराष्ट्रात आणली जाते. मागील आठवड्यात प्रशासनाने टाकलेल्या धाडीत अवैध गुटखा, सुगंधी तंबाखू, भेसळयुक्त खव्यात गुजरात लिंक असल्याचे सिद्ध झाले.
गुजरातमधून शहरात येतोय भेसळयुक्त खवा, सुगंधी तंबाखू
By admin | Published: September 11, 2014 1:27 AM