शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

जिल्ह्यातील सत्तार, शिरसाट, जैस्वाल,बोरनारे चारही आमदारांना पुन्हा उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:19 AM

शिवसेनेच्या पहिल्या यादीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आले.

बापू सोळुंके

छत्रपती संभाजीनगर: राज्य विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट)पक्षाने मंगळवारी रात्री ११ :३० वाजता उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली. या यादीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विद्यमान चार आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. यासोबतच जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांना पैठणमधून निवडणुक रिंगणात उतरविण्यात आले आहे. यासोबतच मराठवाड्यातील अन्य पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर आज २२ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज वाटप करण्यास सुरवात झाली आहे. महायुतीतील भाजपने पहिली यादी घोषित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेची पहिली यादी मंगळवारी घोषित करतील, असे त्यांचे प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांनी सांगितले होते. त्यानुसार आज रात्री उशिरा शिवसेनेने पहिली यादी एक्स या समाजमाध्यमावर प्रसिद्ध केली. शिवसेनेच्या पहिल्या यादीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आले. यात मंत्री अब्दुल सत्तार यांना सिल्लोड मधून तर शिवसेना प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांना औरंगाबाद पश्चिम (अनुसूचित जाती प्रवर्ग राखीव)मधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली. यासोबतच वैजापूर मधून आ. रमेश बोरनारे यांना तर औरंगाबाद मध्य मतदार संघातून आ. प्रदीप जैस्वाल यांना पुन्हा संधी देण्यात आली. तर माजी मंत्री तथा खासदार संदीपान भुमरे यांच्या इच्छेनुसार त्यांचे पुत्र विलास भुमरे यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे.

कन्नडचा पेच कायम

कन्नड विधानसभा मतदार संघातून शिंदेसेनेकडून केतन काजे आणि भरत राजपूत इच्छुक आहेत.यासोबतच भाजपच्या संजना जाधव यादेखील तयारी करीत आहे. शिवसेना आणि भाजप ही दोन्ही मतदार संघ कन्नडवर दावा करीत आहेत. कन्नडचा मतदारसंघाचा पेच कायम असल्याने आज कन्नडची उमेदवारी जाहिर झाली नसल्याचे बोलले जाते.

जालन्यातून खोतकर ,परंडा मधून डॉ. सावंत यांना उमेदवारीछत्रपती संभाजीनगरमधील पाच उमेदवारांसोबतच मराठवाड्यातील नांदेड उत्तर मधून बालाजी देविदास कल्याणकर, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीतून संतोष लक्ष्मण बांगर, जालना मतदार संघातून माजी मंत्री अर्जून पंडितराव खोतकर, धाराशिव जिल्ह्यातील परंडा मधून मंत्री तानाजी सावंत आणि उमरगा (राखीव) मतदारसंघातून विद्यमान आमदार ज्ञानराज चौघुले  यांना शिवसेनेने निवडणूक रिंगणात उतरविले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे