पैठण : शेतकऱ्यांच्या सर्व उसाचे गाळप करण्यात येईल, असे आश्वासन संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तुषार शिसोदे यांनी मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले. कारखान्याची सर्वसाधारण सभा ऑनलाइन पार पडली. सभेतील सर्व विषयांस सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
संत एकनाथची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन तुषार शिसोदे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
चेअरमन यांनी सचिन घायाळ शुगर प्रा.लि. कंपनीने संत एकनाथचे केलेले कारखान्याचे आधुनिकीकरण व त्यामुळे कारखान्याची वाढलेली गाळप क्षमता याबाबत सभासदांना माहिती देऊन कारखान्याने यंदाच्या हंगामात केलेले गाळप व शेतकऱ्यांचे दिलेले पेमेंट या बाबत माहिती दिली. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीने सचिन घायाळ कंपनी डिस्टलरी प्लान्ट कारखान्यावर सुरू करणार असल्याचे तुषार शिसोदे यांनी सांगितले.
सभासदांना यंदा साखर वाटप करण्याच्या सचिन घायाळ यांच्या उपक्रमाचे सभासदांनी विशेष कौतुक केले.
सभेत कावसान, विहामांडवा, लोहगाव, बिडकीन, पाचोड या गटातून मोठ्या संखेने सभासद ऑनलाइन सहभागी झाले होते.
फोटो : कावसान गट कार्यालयातून ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी झालेले आबा मोरे व शेतकरी.
300321\17301617112440011_1.jpg
कावसान गट कार्यालयातून ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी झालेले आबा मोरे व शेतकरी.