औरंगाबाद : राज्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी मराठवाड्याला मिळालेल्या ८१९ कोटींपैकी ३८६ कोटी ११ लाख रुपयांची मदत साडेचार लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे. पहिला हप्ता शासनाने १८ नोव्हेंबर रोजी जाहीर केल्यानंतर मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.
राज्यात आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांमधील शेतीपिकांचे नुकसान झाले. त्याचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला.विभागातील ४१ लाख ४९ हजार १७५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. १८ नोव्हेंबर रोजी शासनाने मदत जाहीर केल्यानंतर मराठवाड्याला ८१९ कोटी रुपये मिळाले. त्या मदतीचे वाटप विभागनिहाय जिल्हा प्रशासनामार्फ त करण्याचे काम वेगाने सुरू आहे. ४४ लाख ३३ हजार बाधित शेतकऱ्यांसाठी तीन हजार २३७ कोटी ७६ लाख ८४ हजार ९६० रुपयांची आवश्यकता आहे. पहिल्या टप्प्यात मिळालेल्या रकमेचे या आठवड्याअखेर वाटप पूर्ण होणे शक्य आहे.
पहिल्या टप्प्यात जिल्हानिहाय वाटप केलेले अनुदानजिल्हा शेतकरी संख्या वाटप अनुदान टक्केऔरंगाबाद १०९६२० ९८ लाख ५९ हजार ८०.९४जालना २०९२८ १७ कोटी १४ लाख १५.५५बीड १७५९८ ११ कोटी ९१ लाख ८.२६लातूर ४६१३७ ४० कोटी ०४ लाख ३९.७८ उस्मानाबाद ६३४९६ ५१ कोटी ११ लाख ६५.३७नांदेड ८१४८७ ६८ कोटी ५८ लाख ५५.७०परभणी ८३०९६ ७३ कोटी ३५ लाख ८३.७२हिंगोली ३३१०४ २५ कोटी ३६ लाख ४७.१७एकूण ४५५४६६ ३८६ कोटी ११ लाख ४७.११