शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

उर्ध्व भागातील धरणातून येणारी आवक घटली, तरी जायकवाडीने ८० टक्के पातळी गाठली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 7:17 PM

Jayakwadi Dam News : नाशिक जिल्ह्यातील धरणसमुहातून होणारे विसर्ग शुक्रवार पासून जवळपास बंद केल्याने गोदावरीतून मिळणारी आवक अत्यंत नगण्य झाली आहे.

पैठण : जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणातून होणारे विसर्ग  नाममात्र करण्यात आल्याने  धरणात येणारी आवक शनिवारी दिवसभरात कमी कमी होत गेली. सायंकाळी धरणात १०३४४ क्युसेस आवक होत होती तर जलसाठा ८०% झाला होता.  

नाशिक जिल्ह्यातील धरणसमुहातून होणारे विसर्ग शुक्रवार पासून जवळपास बंद केल्याने गोदावरीतून मिळणारी आवक अत्यंत नगण्य झाली आहे. नागमठान येथून गोदावरीत ७२० क्युसेस पाणी मिळत होते. अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून देखील विसर्ग घटविण्यात आल्याने प्रवरेतून सायंकाळी सहा वाजता देवगड बंधारा (नेवासा) येथून २७५७ क्युसेस क्षमतेने पाणी जायकवाडी कडे येत होते. 

हेही वाचा - उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला झुकते माप; मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पांसाठी आखडला हात

दरम्यान, स्थानिक पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणात १०३४४ क्युसेस आवक सुरू आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजेस धरणाचा जलसाठा ७९.७३% झाला होता. आवक लक्षात घेता रविवारी ८०% होईल असा अंदाज धरण नियंत्रण कक्षातून वर्तविण्यात आला. १५२२ जलक्षमता असलेल्या धरणाची पाणीपातळी १५१८ फूट झाली होती. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त चार फूट बाकी आहे. धरणात उपयुक्त जलसाठा १७३१.०५८ दलघमी झाला आहे.

हेही वाचा - मुसळधार पावसाचा प्रकोप; घराचे लाकडी छत कोसळून आजोबासह नातीचा मृत्यू

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस