औरंगाबाद : नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुठल्याही शाखेत कोणत्याही भाषेत शिकले तरी मातृभाषेत पेपर देण्याची मुभा यावर्षीपासून देण्यात येणार आहे. विविध अभ्यासक्रम इंग्रजीत शिकल्यावर मातृभाषेत योग्य उत्तर दिल्यास त्याला गुणदान करण्यात येईल. अभ्यासक्रम आणि इतर बदल होईपर्यंत हा एच्छिक पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले म्हणाले.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ४४ अभ्यासक्रमात श्रेणी श्रेयांक पद्धत (सीबीसीएस) लागू करण्याचा निर्णय विद्या परिषदेत घेण्यात आला. ही पद्धत वाणिज्य, मानवविज्ञा शाखेतील काही विषयांत यापुर्वीच लागू करण्यात आली होती. विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शाखेतील विषयांतही ही पद्धत लागू होणार आहे. २-३ विषयांचे अभ्यासक्रम पुढील दोन तीन दिवसांत तयार होऊन त्याही विषयांसबंधी सुचना विद्यार्थ्यांना दिल्या जाईल असे कुलगुरू डाॅ. येवले म्हणाले.
स्वयंअंतर्गत एक विषय शिकता येणार...‘स्वयं’ अंतर्गत ऑनलाईन कोर्सेसला यावर्षी रेकाॅर्डब्रेक नोंदणी झाली आहे. पदवी अभ्यासक्रमात चाईसबेस क्रेडीट सिस्टीम (सीबीसीएस) अर्थात श्रेणी श्रेयांक पद्धतीत यावर्षीपासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक एच्छिक विषय स्वयं अंतर्गत विद्यार्थ्यांना एच्छिक शिकता येईल. त्याचे क्रेडिट विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणात जमा होतील. तसेच मातृभाषेतून परीक्षेची इच्छिक संधीही विद्यार्थ्यांना यावर्षीपासून राहील. असे कुलगुरू डाॅ. येवले म्हणाले.