शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

अखेर नाराजी संपली, अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंना भरवला पेढा

By बापू सोळुंके | Published: March 31, 2024 5:31 PM

'चंद्रकांत खैरेंना निवडून आणण्यासाठी ताकदीने काम करणार.'

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrkant Khaire) आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यातील वादावर रविवारी अखेर पडदा पडला. रविवारी सकाळी आ. दानवे यांनी खैरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. एवढेच नव्हे तर खैरे यांना पेढा भरवला आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छाही दिल्या. खैरे यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्यात काही दिवसांपासून लोकसभेची उमेदवारी मिळण्यावरून कुरघोडीचे राजकारण सुरू होते. प्रचार कार्यालयाच्या स्तंभपूजनाला खैरे यांनी दानवे यांना बोलावले नव्हते. तेव्हा खैरे हे सतत आपल्याला डावलत असतात, अशी नाराजी आ. दानवे यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी आपणही पक्षाकडे लोकसभेचे उमेदवारी मागितल्याचे पत्रकारांना सांगितले होते. उमेदवारी मिळावी, यासाठी दानवे यांनी दबावतंत्राचा वापरही केला होता. यामुळे पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता.

चार दिवसांपूर्वी पक्षाने खैरे यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतरही आ. दानवे यांनी खैरे यांचा नाही तर पक्षाचा प्रचार करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, शनिवारी पक्षप्रमुखांच्या आदेशाने दोन्ही नेत्यांची मुंबईत दिलजमाई झाली. रविवारी सकाळी आ. दानवे हे पुष्पगुच्छ, शाल आणि मिठाईचा बॉक्स घेऊन चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी गेले. तेथे त्यांनी खैरे यांना पेढा भरवला आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी सचीव अशोक पटवर्धन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख राजू वैद्य आदींची उपस्थिती होती.

खैरे यांना निवडून आणण्यासाठी ताकदीने काम करणार

यावेळी पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले की, उमेदवारी मिळेपर्यंत आमच्यामध्ये स्पर्धा आणि नाराजी होती, आता ही नाराजी संपली आहे. मी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता आणि छत्रपती संभाजीनगरचा शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे. यामुळे खैरे यांना विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे.

महायुतीकडे चार ताकदवान माणसंही नाहीतखैरे म्हणाले, आम्ही दोघे नेहमीच एकत्र असतो. अनेक निवडणुका चांगली प्लॅनिंग करून जिंकल्या आहेत. आता ही निवडणूकही जिंकू. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडे चार चांगली माणसेही नाहीत म्हणूनच त्यांना बाहेरून उमेदवार शोधावा लागतो अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेAmbadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४