शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

रुग्णवाहिकेच्या डिझेलसाठी मोजावे लागले पाचशे रुपये

By admin | Published: May 17, 2017 12:20 AM

जेवळी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेसाठी लागणाऱ्या डिझेलचा भुर्दंडही रुग्णांच्या नातेवाईकांनाच सहन करावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कजेवळी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने प्रसुतीसाठी आलेल्या एका मातेला सास्तूर येथील रुग्णालयात रेफर करण्याची वेळ सोमवारी सायंकाळी कर्मचाऱ्यांवर आली़ विशेष म्हणजे या रुग्णवाहिकेसाठी लागणाऱ्या डिझेलचा भुर्दंडही रुग्णांच्या नातेवाईकांनाच सहन करावा लागला. तर रात्रीच्यावेळी इतर रुग्णांवर कर्मचाऱ्यांकडूनच प्रथमोपचार होत असल्याचे समोर आले़लोहारा तालुक्यातील जेवळी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत दक्षिण जेवळी, वडगाव, विलासपूर पांढरी या तीन उपकेंद्रासह रूद्रवाडी, फणेपूर, पूर्व ताडा, वडगाव वाडी, माळेगाव, हिप्परगा, पश्चिम तांडा या गावाचा समावेश आहे. गत दीड वर्षा पासून एका डॉक्टरांचे पद रिक्त आहे़ त्यामुळे एकाच डॉक्टर वरती येथील कारभार सुरू आहे़ परंतु तेही डॉक्टर २ मे पासून मेडीकल रजेवर गेल्याने प्रभारी डॉक्टरवरती हे आरोग्य केंद्र सुरू आहे़१५ मे रोजी रोजी प्रभारी डॉक्टर केंद्रात आलेच नाहीत़ त्यांच्या अनुपस्थितीत १३ रुग्णाची तपासणी येथील कर्मचाऱ्यांनीच केली. सोमवारी सायंकाळी सहा वाजता दक्षिण जेवळी येथील फैमून जुबेर शेख ही महिला प्रसुतीसाठी आली होती. मात्र, डॉक्टर नसल्याने या महिलेला सकाळी आठ वाजता सास्तूरच्या स्पर्श रुग्णालयात रेफर करण्यात आले. या रुग्णासोबत सामाजिक कार्यकर्त्या नसरीन शेख व आशा कार्यकर्ती प्रमिला चव्हाण, साजिदास शेख उपस्थित होत्या. आरोग्य केंद्रातील थंड पाण्याचे रेफ्रिजेटर बंद होते़ तर बाथरूममध्ये दिवाबत्तीची सोय नसल्याने अंधारातच रुग्णाना याचा वापर करावा लागत होता. या गैरसोयी बद्दल रुग्णाच्या नातेवाईकानी नाराजी व्यक्त केली. या आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक व आरोग्य सहाय्यक ही पदे गेल्या पाच वषार्पासून रिक्त आहेत़ कंञाटी आरोग्य सेविका, कंञाटी पर्यवेक्षक ही पदे भरलीच नाहीत़ तर हवालदार, चालक ही पदे रिक्त आहेत़