शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

शिवसेनेच्या लोकार्पणावर मनपा प्रशासनाचा बहिष्कार; भाजपकडूनही कोंडी करण्याचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:54 AM

युती तोडण्यासाठी वरिष्ठस्तरावर गांभीर्याने विचार चालू असल्याची माहिती

ठळक मुद्देशिवसेनेची चारही बाजूने कोंडी करण्यासाठी भाजपचे प्रयत्नलोकार्पण सोहळ्यास मनपा प्रशासन उपस्थित राहणार नाही

औरंगाबाद : युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी सकाळी स्मार्ट शहर बस आणि १६१ एमएलडी क्षमतेच्या एसटीपी प्लँटचे लोकार्पण करण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. या अशासकीय कार्यक्रमावर मनपा प्रशासनाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेची चारही बाजूने कोंडी करण्यासाठी  भाजपने प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या वरिष्ठ स्तरावर युती तोडण्यावरही गांभीर्याने विचार चालू आहे. 

केंद्रात काँग्रेस आघाडी सरकार असताना शहरातील भूमिगत गटार योजनेसाठी तब्बल ३०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेला २३० कोटी रुपये दिले आहेत. राज्य सरकारने  शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १०० कोटी रुपये मनपाला मंजूर केले आहेत. शहर बस, भूमिगत गटार योजनेत बांधण्यात आलेले एसटीपी प्लँट, रस्ते या सर्व कामांसाठी शासनाचे अनुदान प्राप्त आहे. 

या कामांचे लोकार्पण, भूमिपूजन राज्य शासनाच्या संबंधित विभागाचे मंत्री यांच्या उपस्थितीत करावे, अशी भूमिका भाजपच्या मनपातील मंडळींनी धरली. शिवसेनेने अगोदरच युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना २३ डिसेंबर रोजी विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन ठेवले. नगरविकास विभाग मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यामुळे त्यांनाही या कार्यक्रमाला बोलवा, असे उपमहापौर विजय औताडे, राजू शिंदे यांनी मागणी केली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, भेट झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी पुढील आठवड्यात औरंगाबादला येण्याचे मान्यही केले.

शिवसेना नियोजित वेळेनुसारच २३ डिसेंबरला आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शहर बस आणि एसटीपी प्लँटचे लोकार्पण करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. शुक्रवारी महापौरांनी राजशिष्टाचारानुसार कार्यक्रमाची पत्रिका तयार करण्याचे आदेश दिले. या पत्रिकेवर विनीत म्हणून महापालिका औरंगाबाद एवढाच उल्लेख राहणार आहे. शहर बस कशा आणणार ?

क्रांतीचौक येथे शहर बसचे लोकार्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. मनपा प्रशासनाची या कार्यक्रमाला संमती नसेल तर क्रांतीचौकात शहर बस कशा येतील ? पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहर बस क्रांतीचौकात दाखल झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईही करण्याचा मनोदय प्रशासनाने व्यक्त केल्याचे कळते.

प्रशासनाचे महापौरांना पत्रशहर बस, रस्ते, एसटीपी प्लँट आदी कामांसाठी शंभर टक्के शासनाचा निधी आहे. विकासकामांच्या लोकार्पण, भूमिपूजन सोहळ्यास नगरविकास विभागाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उपस्थित राहणे योग्य आहे, असे पत्र मनपा प्रशासनातर्फे महापौरांना सादर करण्यात आले. २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यास मनपा प्रशासन उपस्थित राहणार नाही, हे निश्चित.

भाजपची चाणक्यनीतीउद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने भाजपने शिवसेनेची पूर्णपणे कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दोन लोकार्पण सोहळे संपताच युती तोडण्याचा निर्णय घेण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सेनेच्या बालहट्टाचा बीमोड करण्यासाठी नीती तयार करण्यात येत आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा