शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

अमित देशमुख म्हणाले, मी काँग्रेसचा आमदार..!

By admin | Published: July 14, 2014 11:44 PM

लातूर : अमित देशमुख यांनी सोमवारी दुपारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसोबत चहापानासाठी बैठक झाली.

लातूर : अमित देशमुख यांनी सोमवारी दुपारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसोबत चहापानासाठी बैठक झाली. दुपारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत मनपातील काँग्रेसच्या विरोधी सदस्यांनी थेट राज्यमंत्री अमित देशमुखांना प्रश्न विचारला की ‘तुम्ही आमदार कुणाचे..?’ त्याला उत्तर देताना त्यांनीही ‘मी काँग्रेसचा आमदार असल्याचा सवतासुभा केला. परंतु पुन्हा मी आघाडीचा मंत्री आहे, असेही सांगितले. परंतु यानंतरही दुखावलेल्या नगरसेवकांनी यावर माध्यमांकडे तीव्र नापसंती व्यक्त केली. मनपात सत्ताधारी काँग्रेसला मुख्य विरोधक असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी आज राज्यमंत्री अमित देशमुख यांनी चहापान घेतले. या बैठकीला राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी नगरसेवकांची गाऱ्हाणीही ऐकली. परंतु राकाँ नेते इंद्राळे यांनी तुम्ही आमदार कुणाचे हा सहज प्रश्न विचारला. या प्रश्नांवर राज्यमंत्री अमित देशमुख यांनी मी काँग्रेसचा आमदार असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून काम केले ते आघाडीचा आमदार यावा म्हणून केले. परंतु जर आमदार मी फक्त काँग्रेसचा असल्याचे सांगत असतील तर आम्ही काँग्रेससाठी काम करायचे की नाही ? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल माकणीकर यांनी पत्रकारांशी बोलताना विचारला. (प्रतिनिधी)हा दुजाभाव का ? : माकणीकर निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढले आहेत. वरपासून खालपर्यंत आमच्या दोघांच्या पक्षांची आघाडी होती. परंतु मी फक्त काँग्रेसचा आमदार असल्याचे सांगून ‘आघाडी’तील आमच्या असण्यावर अविश्वास दाखविण्याचा प्रयत्न झाला आहे. याची आम्हाला खंत वाटते अशी प्रतिक्रिया नगरसेवक राहुल माकणीकर आणि दिलीप इंद्राळे यांनी दिली.