शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगरात अमित शाह पहिल्यांदाच मुक्कामी; भाजपचा उमेदवार जाहीर करणार काय?

By विकास राऊत | Published: March 05, 2024 11:26 AM

अमित शाह यांची सभा म्हणजे छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा भाजप लढणार ?

छत्रपती संभाजीनगर : भाजपचे चाणक्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ५ मार्च रोजी सायंकाळी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा होत आहे. सांस्कृतिक मंडळावर लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या सभेत गृहमंत्री शाह हे भाजपचा उमेदवार जाहीर करणार काय, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 

राज्यात लोकसभेसाठी १२ क्लस्टर असून लोकसभा निवडणुकीत ४२ जागा जिंकू, असे शाह यांनी फेब्रुवारी महिन्यात ‘लोकमत’ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितले होते. त्यानंतर त्यांची मराठवाड्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. तीन लोकसभा मतदारसंघांची ही सभा असून गृहमंत्री हे पहिल्यांदाच शहरात मुक्कामी थांबणार आहेत. ते सभेत काय बोलणार, याची उत्सुकता आहे. खडकेश्वर येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या सभेसाठी शाह व अन्य व्हीआयपींच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त लावला आहे. 

देशातील व राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सभा सांस्कृतिक मंडळावरच झाल्यामुळे तेथेच शाह यांची सभा व्हावी, असा आग्रह भाजपकडून होता. छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर या तीन जिल्ह्यांसाठी ही सभा असणार आहे. सभेला सुमारे ५० हजारांहून अधिक लोक येतील, असा दावा भाजप करीत आहे. मराठवाड्यातील पहिल्या सभेचा मान छत्रपती संभाजीनगरला मिळाला असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शाह यांच्या सभेनिमित्त भाजप आणि संघटना पूर्ण ताकदीने कामाला लागली आहे. दरम्यान, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितले, सभेत जास्तीत जास्त दोन ते तीन नेत्यांची भाषणे होतील. सुमारे ४० मिनिटांचे भाषण शाह यांचे असेल. ८:३० वा. ते विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

शाह यांची सभा म्हणजे जागा भाजप लढणार....लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरची जागा भारतीय जनता पक्ष, शिंदे गटासह महायुती लढणार हे जवळपास स्पष्ट होत आहे. मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या महायुतीतील घटक पक्षांनाही उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटालादेखील वाटाघाटीत उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा असली तरी ही जागा भाजप लढणार, यावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाAurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभा