पूर्णवेळ आरटीओ अधिकारी द्या
औरंगाबाद : औरंगाबादेत पूर्णवेळ आरटीओ अधिकारी देणे आणि दोन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी देण्यात यावे, अशी मागणी गृह विभागाकडे केली आहे, अशी माहिती रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाचे अध्यक्ष निसार अहेमद खान यांनी दिली.
कोरोना तपासणीचे ७० हजार किट उपलब्ध
औरंगाबाद : आरोग्य उपसंचालक कार्यालयास सप्टेंबरपासून ६ लाख ५० हजार कोरोना तपासणीसाठी आवश्यक किट प्राप्त झाले होते. या किटचे संपूर्ण मराठवाड्यात वितरण करण्यात आले. आजघडीला ७० हजार किट उपलब्ध असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणीची मागणी
औरंगाबाद : विदर्भातून येणाऱ्या एसटी बसमधील प्रवाशांची कोरोना तपासणी करण्याची मागणी होत आहे. या बस थेट सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानकात येतात. याकडे मनपाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.