- गोविंद टेकाळेअर्धापूर ( नांदेड) : शहरातील इंदिरानगर परिसरात एकाने चक्क राहत्या घरी अवैध सुगंधी तंबाखू बनविण्याचा कारखाना थाटला होता. या प्रकरणी नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत एकास ताब्यात घेतले आहे. यावेळी मशीन आदी मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पैशासाठी काय पण असाच एक प्रकार नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरात उघडकीस आला. अर्धापूर शहरातील इंदिरानगर भागात सय्यद जाकेर ऊर्प बाबा सय्यज गुलाम दस्तगीर याने राहत्या घरातच सुगंधी तंबाखू जन्य पुड्या तयार करण्याचा कारखाना उभारला. याची माहिती मिळताच नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी येथे धाड टाकली. यावेळी पॉकीट बनवण्याची मशीन, सुटी तंबाखू मिळून आली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि जसवंतसिंघ शाहू यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कलम ६,२४ सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने अधिनीयम २००३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनी अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुनील कांबळे हे करीत आहेत.
मोठी देवाण-घेवाण झाल्याची चर्चादरम्यान, धाड टाकली त्या ठिकाणी एका वाहनात अवैध तंबाखूचा मोठ्याप्रमाणावर साठा होता. तो साठा गुन्ह्यामधून अचानकपणे गायब झाला आहे. याप्रकरणी मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण झाल्याची चर्चा दबक्या आवाजात परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे.