शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

पोलिसांना गुंगारा देणारा अवैध दारू तस्कर मुद्देमालासह पकडला

By राम शिनगारे | Published: May 05, 2023 8:11 PM

अवैध मद्य विराेधी पथकाची कारवाई : पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : राहत्या घरातून अवैध देशी, विदेशी दारूची विक्री करणारा सुनील रामभाऊ डुकळे (रा. बजरंगनगर, मुकुंदवाडी) हा अनेकवेळा पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. अवैध मद्य विरोधी पथकास शुक्रवारी डुकळे हा दुचाकीवर अवैध दारूची तस्कारी करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा मारून त्यास मुद्देमालासह पकडले. त्याच्या विरोधात पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ड्राय डे असतानाही डुकळे याच्या घरात १ लाख १ हजार ८२० रुपयांची अवैध दारू सापडली होती. तेव्हा त्याच्या पत्नीच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तेव्हाही सुनील डुकळे हा फरार झाला होता. त्यानंतर महाराष्ट्रदिनी १ मे रोजी सुनील डुकहे याच्या राहत्या घरात अवैध दारूचा साठा करून ठेवला होता. त्याठिकाणी पथकाने छापा मारल्यानंतर ७१ हजार २०० रुपयांची अवैध दारूचा साठा जप्त केला होता. तेव्हा त्याचा पाहुणा राजू नागू जाधव यास पकडण्यात आले होते. त्याच्याही विरोधात मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदवला. दोन्ही वेळेस सुनील हा फरार होण्यात यशस्वी झाला होता.

शुक्रवारी अवैध मद्य विरोधी पथकाचे उपनिरीक्षक रमाकांत पटारे , हवालदार महेश उगले, प्रकाश चव्हाण, मनोज चव्हाण, नितेश सुंदर्डे, जालिंदर रंधे, आरती कुसळे यांना पथकास सुनील डुकळे हा दुचाकीवरून दारूचे बॉक्स घेऊन हनुमाननगरकडून एन ४ सिडकोकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने रस्त्यावर सापळा लावून सुनील डुकळे व त्याचा सहकारी अमाेल अंकुश पवार या दोघांना पकडले. या दोघांकडून १ लाख १० हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद