लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरातील अनधिकृत नळजोडणीविरुद्ध महापालिकेने धडक मोहिमेचा इशारा दिला असून १ ते १५ आॅगस्टदरम्यान अधिकृत नळजोडणी नियमित करण्यास शेवटची संधी देण्यात आली आहे.महापालिकेच्या वतीने १६ आॅगस्टपासून शहरात अवैध नळजोडणीविरुद्ध कार्यवाही करण्यात येणार आहे. मनपाच्या विशेष पथकाकडून मालमत्तेची तपासणी करण्यात येणार आहे. आगामी १५ दिवसांत नागरिकांनी मनपाकडून दिलेल्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपली नळजोडणी नियमित करण्यासाठी मुख्यालयातील पाणी पुरवठा विभागाकडे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. अनधिकृत नळ मोहिमेत सापडल्यास दंडासह अनधिकृत नळधारकावर शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पाण्याची चोरी करणे आदी आरोपाखाली कारवाई केली जाणार आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
अनधिकृत नळजोडणीविरुद्ध नांदेड मनपाची जोरदार मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:27 AM