शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

वेताळवाडीचा दुर्लक्षित प्राचीन किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 6:56 PM

वारसा औरंगाबादचा : अजिंठा ते वेरूळच्या डोंगररांगात अंतूर, लहुगड, नांद्रा, तालतम, सुतोंडा, राहिलगड, मस्तगड असे दुर्लक्षित गड-किल्ले आहेत. त्यातीलच एक वेताळवाडीचा किल्ला होय. सोयगावपासून अवघ्या ३ कि.मी.अंतरावर वेताळवाडी गावाच्या पश्चिम, दक्षिण बाजूच्या कोपऱ्यावर हा किल्ला उभारण्यात आला आहे.

- प्रशांत तेलवाडकरपर्यटनाची  राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्राचीन वास्तूचा ऐतिहासिक ठेवा बघण्यास मिळतो. त्यातीलच एक निसर्गरम्य सोयगाव तालुक्यातील वेताळवाडीचा किल्ला होय. अनेकांना या किल्ल्याचे नाव पहिल्यांदाच ऐकल्यासारखे वाटत असेल, पण हा किल्ला किती जुना आहे याविषयी वेगवेगळे तर्क लावण्यात येतात. कारण संदर्भासाठी कोणताही शिलालेख येथे नाही, पण भग्नावस्थेतील हा किल्ला पाहिल्यावर पूर्वीच्या त्याच्या सौंदर्याची कल्पना येऊ शकते. 

अजिंठा ते वेरूळच्या डोंगररांगात अंतूर, लहुगड, नांद्रा, तालतम, सुतोंडा, राहिलगड, मस्तगड असे दुर्लक्षित गड-किल्ले आहेत. त्यातीलच एक वेताळवाडीचा किल्ला होय. यास ‘वाडीचा किल्ला’ असेही म्हणतात. सोयगावपासून अवघ्या ३ कि.मी.च्या अंतरावर वेताळवाडी गावाच्या पश्चिम, दक्षिण बाजूच्या कोपऱ्यावर हा किल्ला उभारण्यात आला आहे. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून १९०० फूट (६२५ मीटर) आहे. हळद गावाकडे घाट रस्त्याने जाताना या किल्ल्याने डावीकडे अख्ख्या डोंगरालाच जणू कवेत घेतले आहे. अजिंठा रांगेतील सर्वात उंच ठिकाणावर असलेल्या या किल्ल्याला जंजाळा किल्ल्याच्या दिशेने तोंड असणारा उत्तरमुखी ‘जंजाळा दरवाजा’ हा मुख्य दरवाजा आहे.

याशिवाय पायथ्याशी असलेल्या वेताळवाडी गावाच्या दिशेने असणाऱ्या दरवाजाला ‘वाडी दरवाजा’ म्हटले जाते. सुमारे २० फूट उंचीचे हे दोन भक्कम दरवाजे या किल्ल्यात आहेत. तसेच उपदरवाजेदेखील आहेत. जिभीसारखे सहसा न पाहायला मिळणारे दुर्ग वैशिष्ट्य येथे आहे. याशिवाय कातळ कोरीव टाकी, तलाव, अंबरखाना, हमामखाना, बारादरीसारखी अनोखी वास्तू, बांधील खंदक, चोर दरवाजा, सर्वात उंच भागावर कमानींनी वेढलेला एक हवामहल आहे. या हवामहलमधून पायथ्याशी असलेले गाव दिसते. दूरवर पसरलेली तटबंदी, नागमोडी हळदा घाट आणि वेताळवाडी धरणाचा नजरा अनुभवायला मिळतो. पावसाळ्यात या किल्ल्यावर सोयगावचे निसर्गरम्य वातावरण मोहित करते.

या किल्ल्याच्या परिसरात हजारो सीताफळाची झाडी आहे. येथील सीताफळ देशभर प्रसिद्ध आहेत. पुरातत्व विभागाकडे या किल्ल्याच्या संवर्धन, देखभालीची जिमेदारी आहे. या किल्ल्याच्या पूर्व बाजूस म्हणजेच अजिंठा लेणीच्या पाठीमागील भागात रुद्रेश्वर लेणी आहे. ज्या लोकांना किल्ले पाहण्याची, पर्यटनाची आवड आहे, असे लोक आवर्जून या किल्ल्यास भेट देत असतात. मात्र, प्रचार-प्रसाराअभावी सोयगाव तालुक्यासारखाच हा किल्ला दुर्लक्षित राहिला आहे. पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ निर्माण झाली आहे. अशा प्रसन्न वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या जिल्ह्यातील हा वेताळवाडीचा किल्ला पाहण्यास नागरिकांनी अवश्य जावे. 

टॅग्स :FortगडAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन