लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शिक्षण बीडमध्येच झाले. परंतु, राठीजींना जवळून पाहण्यात आले नव्हते. एका पासपोर्ट फोटोच्या आधारे त्यांचा पुतळा तयार करण्यासाठी माझ्यासमोर अनेक दिव्य होते. एक वर्षानंतर नमुना म्हणून साकारलेला पुतळा पाहिल्यानंतर काकीजी (बसंताबाई राठी) आणि नातेवाईकांच्या भावना अनावर झाल्या. हुंदके दाटून आले. काही वेळ अश्रुंना वाट मोकळी केली. तेव्हाच मी हा पुतळा निश्चित करुन फायनल टच दिला अशी प्रतिक्रिया सर्वात मोठा आकाशकंदिल बनवून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला बीड येथील शिल्पकार राहुल राऊत याने व्यक्त केली.शहरातील दानशूर व्यक्तीमत्व कै. रामप्रसाद बी. राठी यांच्या पुढाकाराने नामलगाव, घोसापुरी येथे उभारलेल्या श्री गणेश समन्वय आश्रमात त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आचार्य गोविंददेव गिरी यांच्या हस्ते नुकतेच झाले. हा हुबेहुब व देखणा पुतळा सध्या पुणे येथे कार्यरत व बीड येथील राहुल राऊत याने साकारला. या कार्यक्रमात राहुल व बंधु जयंत राऊत यांचा आचार्य गोविंददेव गिरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर, आर. आर. कासट आदी उपस्थित होते.पुतळा निर्मितीबद्दल संवाद साधला असता राहुल म्हणाला, पुतळा बनविण्याची संधी मिळाली. स्व. राठी यांचा एक पासपोर्ट फोटो देण्यात आला होता. एका फोटोवरुन पुतळा निर्मिती अशक्यप्राय गोष्ट होती. साधारण दोनशे प्रकारचे मोजमाप घेवून सुक्ष्म अभ्यासातून पुतळा बनवावा लागत असतो. तंतोतंत मोजमाप महत्वाचे असते. हयात नसताना केवळ फोटोवरून राठी यांचा पुतळा साकारता आला. नमुनाखातर पुतळा नातेवाईकांना दाखविला. पुतळा पाहणा-यांच्या भावभावनांचे अंतरंग जाणून घेत केलेल्या कामाचे साफल्य होत असल्याचे लक्षात आले. याला कलारसिकांचीही दाद मिळाली. सोशल मिडियावरून प्रतिसाद लाभला. हा पुतळा हा पुतळा मार्बल पावडरमध्ये बनविण्यात आला आहे. तो मार्बलप्रमाणे दिसतो. तो तयार करण्यासाठी एक महिन्यापेक्षा जास्त वेळ लागल्याचे राहुल म्हणाला.गिनीज बुक अन् आॅस्ट्रेलियात गणेशमूर्तीबीड येथून कलाशिक्षणासाठी पुण्याला गेल्यानंतर राहुलने १९९७ मध्ये दिवाळीकाळात ३८ फूट ऊंच व २२ फूट रुंद महाकाय आकाशकंदिल बनविला. या विक्रमाची गिनीज बुक आॅफ वर्ल्डमध्ये नोंद झालेली आहे. तर मागील वर्षी राहुलने बनविलेली बाप्पांची मूर्ती आॅस्ट्रेलियातील मराठीजनांच्या गणेशोत्सवात होती.
नातेवाईकांच्या भावना अनावर झाल्या अन् पुतळ््याला दिले अंतिम रूप ...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:34 AM