हरी मोकाशे लातूरज्या कुटुंबात अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्याची मारामार आहे, अशा दारिद्र्यरेषेखालील, आर्थिकदृष्ट्या मागास असलेले कुटुंब निर्धूर कसे असणार? स्वयंपाक करायचा म्हटले की, चुलीला लाकडाची ऊद आलीच. चटकन् चूल पेटविण्यासाठी डोळे चोळत तोंडाने फुंकर घालण्याची झालेली नित्याची सवय. आता या सवयीला ‘प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने’ने बगल दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मागासलेली ४२ हजार ५५१ कुटुंबे अनुदान व विनातारण कर्जावर निर्धूर झाली आहे.आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगामुळे प्रत्येकाच्या हाती मोबाईल आला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाची माहिती क्षणार्धात खेड्यातील व्यक्तींनाही मिळू लागली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या व्यक्तीही मोबाईल हाताळत असल्याचे दिसत आहे. पण त्यांच्या कुटुंबात एखादा पाहुणा आला की, त्याला चहा, नाश्ता अथवा भोजन बनविण्यासाठी चूल पेटवावी लागते. त्यासाठी गृहिणींची सुरू असलेली खटपट आणि डोळ्यांना होणारा त्रास आलाच. ग्रामीण भागातही वृक्ष संवर्धन व्हावे आणि प्रत्येक कुटुंब निर्धूर व्हावे, यासाठी गेल्या अकरा महिन्यांपासून देशात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी सन २०११ च्या जनगणनेनुसार दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबांची निवड करण्यात आली. लातूर जिल्ह्यात अशी ६८ हजार २४३ कुटुंब आढळले. या कुटुंबांकडून योजनेसाठी प्रस्ताव घेण्यात आले. त्यात ५४ हजार ४३७ प्रस्ताव पात्र ठरले. त्यातील ४४ हजार ४८२ कुटुंबांच्या प्रस्तावांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आणि त्यातील ४२ हजार ५५१ कुटुंबांना अनुदान व विनातारण कर्जावर गॅस देण्यात आले आहेत.
अन् त्यांचे आयुष्य झाले ‘निर्धूर’
By admin | Published: March 30, 2017 11:42 PM