शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

...अन् मध्यरात्री केला मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:47 AM

मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा लढा दीर्घकाळापासून सुरू होता. राज्य मंत्रिमंडळाने १४ जानेवारी १९९४ रोजीच्या बैठकीत नामविस्तार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी होऊ न देण्याचा इशारा शहरातील एका गटाने दिला होता. यामुळे मनपाच्या सहकार्याने मध्यरात्री ११ ते पहाटे ४ या वेळेतच प्रवेशद्वारावरील नामविस्ताराची मोहीम फत्ते केल्याची आठवण तत्कालीन कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितली.

ठळक मुद्देविद्यापीठ नामविस्ताराचे रौप्यमहोत्सवी वर्षात उद्या पदार्पण तत्कालीन कुलगुरू विठ्ठलराव घुगे यांच्याशी संवाद

- राम शिनगारे औरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा लढा दीर्घकाळापासून सुरू होता. राज्य मंत्रिमंडळाने १४ जानेवारी १९९४ रोजीच्या बैठकीत नामविस्तार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी होऊ न देण्याचा इशारा शहरातील एका गटाने दिला होता. यामुळे मनपाच्या सहकार्याने मध्यरात्री ११ ते पहाटे ४ या वेळेतच प्रवेशद्वारावरील नामविस्ताराची मोहीम फत्ते केल्याची आठवण तत्कालीन कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितली.

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ऐतिहासिक लढा जोमात होता. विधिमंडळाने नामांतराचा ठराव मंजूर केलेला असतानाही त्या ठरावाची अंमलबजावणी होत नव्हती. मात्र, डिसेंबर १९९३ मध्ये तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक सत्यपाल सिंग (विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री) हे भेटीला आले. त्यांनी नामांतर झाल्यास विद्यापीठ आणि महाविद्यालयातील स्थिती कशी राहील, याविषयी माहिती विचारली. तेव्हा महाविद्यालये विद्यापीठ नामांतराचे स्वागतच करतील. तरीही काही परिस्थिती उद्भवल्यास आम्ही सक्षम असल्याचे सत्यपाल सिंग यांना स्पष्ट केले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे संभाव्य परिस्थितीचा आढावा घेत होते. नवीन वर्ष उजाडले तेव्हा नामांतराच्या हालचाली वाढल्या. उच्चशिक्षण सचिव सतत संपर्कात होते. १४ जानेवारी १९९४ रोजी सकाळी ९ वाजताच फोन खणखणला. समोरून उच्चशिक्षण सचिव लखनपाल बोलत होते. त्यांनी सांगितले की, विद्यापीठ नामविस्तार ठराव मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. तुम्हाला सायंकाळपर्यंत शासन निर्णयाची प्रत मिळेल. ही प्रत मिळताच तात्काळ अंमलबजावणी करा, अशा सूचना मिळाल्यानंतर फोन कट झाला.

यानंतर तात्काळ अधिका-यांची बैठक बोलावली. सगळ्यांना संभाव्य परिस्थितीची कल्पना देत तयार राहण्याच्या सूचना दिल्या. तेथून नामविस्ताराचे समर्थक खासदार बापूसाहेब काळदाते यांना सायंकाळी विद्यापीठात नामविस्तार साजरा करण्याचे आमंत्रण दिले. संध्याकाळपर्यंत शासन निर्णय मिळाला. तेव्हाच खा. काळदाते यांच्या उपस्थितीत दणक्यात उत्सव साजरा केला. मात्र, शहरातून अशी माहिती कळाली की, विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर नामविस्तार होऊ न देण्यासाठी एक गट प्रयत्न करणार आहे. तेव्हाच निर्णय घेतला की, हे काम रातोरात करायचे. यासाठी तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. गोविंद घारे यांची मदत घेतली. शहर पोलीस आयुक्तांनी पुरेसे संरक्षण दिले होते. १४ जानेवारी १९९४ च्या रात्री ११ वाजता विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ हे नाव टाकण्यास सुरुवात केली. तेव्हा माझ्यासह विद्यापीठातील काही अधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते. हे काम पहाटे ४ वाजेपर्यंत चालले. प्रवेशद्वारावर नामविस्तार झाल्यानंतरच त्या ठिकाणाहून झोपण्यासाठी घरी गेलो. रातोरात नामविस्ताराची मोहीम फत्ते केली. नामविस्ताराचे विरोधक सकाळी नामविस्तार करू न देण्यासाठी जमले. मात्र, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत सायंकाळीच नामविस्तार झालेला असल्याचे दिसून आले. नामविस्तार ही घटना माझ्या जीवनातील सर्वाधिक महत्त्वाची आणि आनंदाची आहे.

देश-विदेशातून संदेशनामविस्तार झाल्यानंतर आनंद व्यक्त करणारे संदेश देश-विदेशातून मिळाले. यात ब्रिटनचे तत्कालीन उच्चायुक्त एल. एम. सिंघवी यांनी विशेष अभिनंदन केले. यातच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला विद्यापीठात येण्याचे आश्वासन दिले. यानुसार १४ एप्रिल रोजी सिंघवी यांनी विद्यापीठात येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. याशिवाय अमेरिका, युरोपच्या अनेक देशांतून संदेश आले. देशभरातून तर संदेशाचा ओघ सुरूच होता.दोन दिवसांत स्टेशनरी बदललीविद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर त्याच दिवशी मध्यरात्री नामविस्तार करण्यात आला होता. मात्र, खरे आव्हान हे विद्यापीठाच्या सर्व प्रकारच्या स्टेशनरीवर नामविस्तार करण्याचे होते. पहिल्याच दिवशी सर्व जुनी स्टेशनरी रद्द केली. नवीन स्टेशनरी दोन दिवसांत तयार केली. यासाठी सर्वच जण रात्रंदिवस काम करीत होते. विद्यापीठाच्या प्रिंटिंग प्रेसमधील मशिनरी बदलण्यात आल्या. नामविस्ताराच्या नावासह सर्व प्रकारचे अर्ज, फॉर्म तयार करू घेतले.ख-या अर्थाने मेकओव्हरनामविस्तारानंतरच राज्य सरकारने विद्यापीठाला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली. मुख्यमंत्री शरद पवार यांनी विविध योजना तयार करून प्रस्ताव देण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार २२ कोटी रुपयांचा कृती आराखडा राज्य सरकारकडे पाठवला. पहिल्या टप्प्यात साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यात केमिकल टेक्नॉलॉजी, पर्यावरण, पर्यटन, संगणकशास्त्र विभाग सुरू केले. विद्यापीठात प्राध्यापकांच्या ५५ जागांना मंजुरी मिळाली. परीक्षा भवनाच्या इमारतीला मुहूर्त सापडला. नामविस्तारामुळे विद्यापीठ ख-या अर्थाने मेकओव्हर झाले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद