दारूड्या नव-याचा त्रास : गोदापात्रात आत्महत्येसाठी आलेल्या विवाहितेला महिलेने वाचविलेकायगाव : पती सतत दारू पिऊन मारहाण करीत असल्याच्या त्रासाला कंटाळलेली विवाहिता गोदावरी नदीच्या पात्रात आत्महत्या करण्यासाठी आली. मात्र, ऐनवेळी या विवाहितेच्या मदतीला दुसरी महिला जणू देवदूत म्हणून धावून आली आणि अनर्थ टळला. पोलिसांच्या मदतीने तासभराच्या प्रयत्नानंतर सदर विवाहितेच्या कुटुंबियांची माहिती काढून तिला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.शुक्रवारी दुपारी दीड वाजेदरम्यान जुने कायगाव येथील निशा दिनेश कोकरे या दुचाकीवरून प्रवरा संगम येथे बाजारासाठी जात होत्या. औरंगाबाद-अहमदनगर राष्ट्रीय मार्गावरील गोदावरी नदीच्या पुलावरून जात असताना त्यांना एक विवाहिता पुलाच्या संरक्षक कठड्यानजीक संशयास्पद हालचाल करताना दिसून आली. त्यांनी दुचाकी थांबवून तात्काळ गंगापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गस्तीवर असणारे मुख्य पोलीस जमादार गणेश काथार आणि जमादार रामानंद बुधवंत काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत निशा यांनी सदर विवाहितेला रोखून धरले. तोपर्यंत पोलिसांनी फोन करून कायगावचे पोलीस पाटील संजय चित्ते, गणेशवाडीचे पोलीस पाटील भीमराज निरपळ आणि अंमळनेरचे पोलीस पाटील सुधाकर साळवे यांनाही घटनास्थळी बोलावून घेतले. या सर्वांच्या मदतीने पोलिसांनी सदर विवाहितेची समजूत घालून पुलावरून सुरक्षितस्थळी नेले. नंतर पोलिसांनी आस्थेवाईकपणे सदर महिलेची विचारपूस केली. सदर विवाहिता ३८ वर्षांची असून ती मूळची परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या ती बजाजनगर, पंढरपूर जि. औरंगाबाद येथे राहते. पोलिसांनी तात्काळ विवाहितेच्या जावई आणि मुलीच्या सासºयांना (व्याही) फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांना सर्व हकीकत समजावून सांगितली आणि सदर महिलेला त्यांच्या स्वाधीन केले.निशा कोकरे व पोलिसांची समयसूचकताजुने कायगाव येथील निशा कोकरे यांनी समयसूचकता दाखवून तात्काळ पोलिसांना माहिती दिल्याने आणि घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने सदर विवाहितेचे प्राण वाचले. निशा या विवाहितेसाठी देवदूत बनून आल्याचा प्रत्यय आला. या घटनेची गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.वर्षभरापूर्वीच मुलानेही केली होतीदारुड्या बापाला वैतागून आत्महत्यावडिलांच्या दारूच्या सवयीला कंटाळून वर्षभरापूर्वीच या विवाहितेच्या तरुण मुलाने जुन्या कायगावच्या गोदावरी पात्रात आत्महत्या केली होती. मुलाच्या जाण्यानंतरही पतीच्या सवयीत बदल झाला नाही. त्यामुळे याच ठिकाणी आत्महत्या करून आपल्या मुलाकडे जाणार होते, अशी हृदयद्रावक कहाणी या विवाहितेने पोलिसांना सांगितली. पती नातेवाईकांना भेटण्यासाठी दुसºया गावी गेल्याची संधी साधून मी आज नदीच्या पात्रात आत्महत्या करण्यासाठी आले होते, अशी माहितीही तिने दिली.महिनाभरापूर्वीही रोखली होती आत्महत्यामहिनाभरापूर्वी २३ जानेवारी रोजी गोदावरी नदीच्या पात्रात आत्महत्या करण्यासाठी आलेल्या एका वृद्ध महिलेचे प्राण पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी अशाच प्रकारे वाचविले होते.
...अन् ‘ती’ देवदूत बनून अवतरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:47 AM