औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील शेवता येथील एका माजी सैनिकाच्या दुचाकीच्या सीटखाली चक्क साप निघाल्याची घटना बुधवारी (दि.२७) सायंकाळी घडली. हा प्रकार लक्षात येताच माजी सैनिकासह पत्नीची चांगलीच भंबेरी उडाली. मात्र, त्यांनी प्रसंवावधान राखत दुचाकी जागेवरच सोडून घटनास्थळाहुन बाजुला आसरा घेतल्याने पुढील धोका टळला. या घटनेमुळे रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेवता येथील सेवा निवृत्त सैनिक अंकुशराव बेडके बुधवारी सायंकाळी पत्नी समवेत शेवता येथून वडोदबाजारला दुचाकीवरून येत होते. शेवता येथून पुढे काही अंतर आल्यावर त्यांच्या दुचाकीचे पेट्रोल संपले. त्यामुळे त्यांनी दुचाकी खाली वाकवली. या दरम्यान, दुचाकीच्या सीटखाली दडून बसलेल्या धामीण जातीच्या सर्पाने तोंड बाहेर काढले. त्याचा स्पर्श बेडके यांच्या पायाला झाला असता त्यांनी सीटखाली बघितले असता त्यांना तेथे साप असल्याचे निदर्शना आले. यानंतर त्यांनी दुचाकी जागेवरच सोडून पळ काढला, हे पाहून त्यांची पत्नीही त्यांच्या मागे धावत सुटली. काही अंतरावर गेल्यास बेडके यांनी पत्नीला याचीं माहिती दिली. तो पर्यत रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांचे गाडीकडे लक्ष गेले. यावर बेडके यांनी त्यांना दुचाकीच्या सीटखाली साप निघाल्याचे सांगितले. तेव्हा हा साप बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
यानंतर सर्वांनी सुटकेचा नि : श्वास सोडलाबेडके यांनी दुचाकीच्या खाली सोडून दिल्यामुळे काहीवेळ बाहेर निघालेला साप पुन्हा सीट खाली दडून बसला. यामुळे सीट काढण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हते. अखेर शेवटी एका इसमाने मोठ्या हिमतीने दुचाकीचे सीट काढले. परंतू साप काही बाहेर निघत नसल्याने बराच वेळ लोकांनी थांबून त्याला बाहेर काढण्याची शक्कल लढवली. मात्र, तरीही प्रयत्न अयशस्वी ठरले. यांनतर काही नागरिकांनी त्याला लाकडाने छेडताच साधारणपणे सात ते आठ फुट लांब इतक्या धामीण जातीच्या सर्पाने दुचाकीतून बाहेर पडून धूम ठोकली. अन सर्वांनी सुटकेचा नि : श्वास सोडला.