शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

...अन् दगड बोलू लागले! छिन्नी हातोड्याच्या घावातून तरुणाईची लक्षवेधी शिल्पांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2022 2:01 PM

कार्यशाळेत पहिल्या दिवशी खदानीवरून दगड निवडून आणण्यापासून दगडी शिल्प घडविण्याचा प्रवास खूप मेहनतीचा राहिला.

औरंगाबाद : लेण्यांच्या शिल्प प्रतिकृती किंवा दगडी शिल्पाचे काम करणाऱ्या कलावंतांची संख्या देशभरातच फारच कमी आहे. या कलेची जोपासना सध्याच्या काळाची गरज आहे. त्यासाठी राज्यभरातील कलाकारांचा समन्वय, कलेला प्रोत्साहन आणि नवे तंत्र आत्मसात करण्यासाठी दगडी शिल्पकलेच्या कार्यशाळांचा मोठा हातभार लागत असल्याचे मत यशवंत कला महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र तोरवणे यांनी माडले.

यशवंत कला महाविद्यालयात शंकरराव बेडसे यांच्या जयंतीनिमित्त दुसरी राज्यस्तरीय दगडी शिल्पकला कार्यशाळा घेण्यात आली. १० दिवसीय कार्यशाळेत जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी प्राध्यापक मधुकर वंजारी यांनी सहभागी कलाकारांना मार्गदर्शन केले. २४ जानेवारीपासून सुरू झालेल्या कार्यशाळेत पहिल्या दिवशी खदानीवरून दगड निवडून आणण्यापासून दगडी शिल्प घडविण्याचा प्रवास खूप मेहनतीचा राहिला. ते पाहून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या वैज्ञानिक संवर्धनाचे औरंगाबाद मंडळाचे उपअधीक्षक श्रीकांत मिश्राही भारावले. देशभरात लेण्यांच्या संवर्धनात शिल्पकलाकार मिळणे अवघड झाले आहे. तीन बाय साडेतीन फुटांच्या दगडी शिल्पासाठी लागणाऱ्या मेहनतीवरून शेकडो वर्षांपूर्वी कोरलेल्या भव्य लेण्यांसाठी त्या कलाकारांनी किती मेहनत घेतली असेल, याची प्रचिती येते, असे ते म्हणाले. यावेळी प्रा. शुभम साळवे, प्रा. पंढरीनाथ खैरनार, पूनमचंद देशवाल, सरिता उंबरकर, अभिजित पाटील, आदींची उपस्थिती होती.

लक्षवेधी शिल्पे...चरायला जाणाऱ्या गायी, डोळ्यांतील राक्षस यासह समाजातील घडामोडीचे प्रतिबिंब उमटवणारी शिल्पे कलावंतांनी घडविली. नवनाथ फेंगसे, योगेश लोखंडे, अरविंद मंगल, अभिषेक साळवे, शुभम साळवे, साईनाथ आडे, आकाश जमदार, विजय पावसकर, किशोर तायडे, रोहित वारेकर, कैलास आडे, शुभम जाधव, दर्शन खारतमाल, मंगेश फुलारी, संकेत उबाळे, ओंकार वाकडे, आदी कलावंतांनी या कार्यशाळेत सहभाग घेत लक्षवेधी शिल्पे साकारली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादartकला