शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

भुलीचे इंजेक्शन कालबाह्य अन् वन विभागाला गुंगी; माकडाच्या मदतीसाठी रेस्क्यू टीम कुठेय? 

By साहेबराव हिवराळे | Published: November 29, 2023 7:53 PM

वाळूज औद्योगिक परिसरामध्ये वेदनेने विव्हळत असलेल्या माकडाला वाचविण्यासाठी वन विभागाचा एकही कर्मचारी फिरकला नाही.

छत्रपती संभाजीनगर : वन्य प्राण्यांवर उपचार करण्यासाठी भूल देण्याकरिता असलेले इंजेक्शन कालबाह्य झाले असून, मदतीला येणारी रेस्क्यू टीम ‘नॉट रिचेबल’ झाली आहे. वाळूज औद्योगिक परिसरामध्ये वेदनेने विव्हळत असलेल्या माकडाला वाचविण्यासाठी वन विभागाचा एकही कर्मचारी फिरकला नाही.

एमआयडीसी वाळूज औद्योगिक क्षेत्रामध्ये बुधवारी दुपारी आपल्या कंपनीत घुसलेल्या जखमी माकडाला पाहून उद्योजक घाबरला आणि तो वर्कशॉपमधून बाहेर पडायला लागला. त्यावेळी या वन्य जिवाने आधी त्याच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत असल्यामुळे ते वेदनेने विव्हळत होते. त्यास पाणी, केळी आणि बिस्कीट दिली. वेदनेतून तो मदतीची याचना या उद्योजकाकडे करत होता. समाजसेवी संघटना तसेच वन विभागास फोन करूनही कोणी फिरकले नाही. अखेर सायंकाळी अंधारात माकड जखमी अवस्थेत निघून गेले.

वाहने देखभाल - दुरुस्तीअभावी पडून

शहर परिसर तसेच ग्रामीण परिसरामध्ये अशी घटना समजल्यास वन विभागाने दोन वर्षांपूर्वी रेस्क्यू टीम तयार केली होती. त्यांना वाहने व आपत्तीप्रसंगी लागणारे साहित्य विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली होते. यातील काही जणांची वन विभागाने कामे काढून घेतली आहेत, तर वाहने जुनी होऊन देखभाल - दुरुस्तीअभावी पडून आहेत.-आदी गुडे, वन्यजीव अभ्यासक

वन्य प्राण्यांच्या मदतीला कोणी आलेच नाही....जखमी वानराच्या मदतीला अखेरपर्यंत कुणीही आले नाही. बराच वेळ समाजसेवी संघटनेचे जयेश शिंदे हे यासाठी प्रयत्न करीत होते.-किशोर सूर्यवंशी

मग पथकाचा उपयोग काय?अधिकाऱ्यांना कळवूनही जर मदतीची भावना नसेल या पथकाचा उपयोग काय, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. यासाठी समाजसेवी संघटना काम करतात. त्यांनीही वेळीच मदत करणे गरजेचे आहे. याविषयी वरिष्ठांकडे बैठकीमध्ये प्रश्न मांडणार आहोत.-मानद वन्यजीव सदस्य डॉ. किशोर पाठक

काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणवन विभागातील रेस्क्यू पथकात चार-पाच कर्मचाऱ्यांना जखमी प्राण्यांना किंवा शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या प्राण्यास पकडून जंगलात सोडण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे वन विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.. 

टॅग्स :forest departmentवनविभागAurangabadऔरंगाबाद