शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

अंगणवाडी मुख्य सेविकांना मिळणार प्रशिक्षण..!

By admin | Published: February 05, 2017 11:35 PM

जालना : राजमाता जिजाऊ मध्यमस्तर प्रशिक्षण केंद्र आता अहमदनगरहून जालना येथे स्थलांतरित झाले आहे

जालना : राजमाता जिजाऊ मध्यमस्तर प्रशिक्षण केंद्र आता अहमदनगरहून जालना येथे स्थलांतरित झाले आहे. अंगणवाड्यांवर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या मुख्य सेविका तसेच पर्यवेक्षिकांना या केंद्रातून प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे मराठवाड्याचे एकमेव प्रशिक्षण केंद्र जालन्यात सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वीच शासनाने हा आदेश काढला. महिला व बाल विकास विभागाकडून एकात्मिक बालविकास सेवा योजना राबविण्यात येते. अंगणवाड्यांत नियुक्त करण्यात येणाऱ्या मुख्यसेविका तसेच पर्यवेक्षिकांना प्रशिक्षण देण्यासाठी मध्यमस्तर केंद्र कार्यरत आहे. पूर्वी हे केंद्र अहमदनगर येथे होते. त्यामुळे मराठवाड्यातील सेविकांना तेथे जाणे गैरसोयीचे ठरत होते. गैरसोय लक्षात घेता शासनाने हे केंद्र जालना येथील कर्मवीर प्रतिष्ठान संस्थेच्या आवारात हे केंद्र स्थलांतरित केले आहे. या केंद्रात आता मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांतील मुख्य सेविका व पर्यवेक्षिकांना जालना येथे प्रशिक्षण मिळणार आहे. जिल्ह्यात १९०० पेक्षा अधिक अंगणवाड्या आहेत. त्यात ७० मुख्य सेविका आहेत. यांना वेळोवेळी दिले जाणारे प्रशिक्षण आता जालन्यात मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पवार म्हणाल्या, सदर केंद्र जालना येथे स्थलांतरित झाले आहे. जिल्ह्यासाठी ही महत्वाची बाब असून, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील मुख्य सेविका तसेच पर्यवेक्षिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पदनिर्मिती शासन करणार असून, या संबंधीची माहिती शासनाकडून मागविण्यात आली आहे. केंद्रासाठी विशेष निधीची तरतूद असून, केंद्रातून प्रशिक्षण देण्याचे काम काही दिवसांत सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)