शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

आयफोन मिळाला नसल्याचा राग, ट्रक चालकाच्या मुलाने आयुष्य संपवले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 2:06 PM

नुकताच बारावी उत्तीर्ण झालेला युवक पदवीच्या प्रथम वर्षाला शिकत होता.

छत्रपती संभाजीनगर : आयफोन मिळत नसल्याच्या रागातून २० वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिकेत प्रल्हाद म्हस्के (२०) असे मृत तरुणाचे नाव आहे.

उस्मानपुऱ्यात सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. सध्या सर्वच वयोगटांत मोबाइलच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. त्यात तरुण वर्गामध्ये महागड्या मोबाइलचे मोठे आकर्षण आहे. अनिकेत आई, वडील व लहान भावासह नागसेननगरमध्ये राहत होता. शनिवारी रात्री त्याचा १६ वर्षांचा लहान भाऊ परिसरातच राहणाऱ्या मामाकडे झोपण्यासाठी गेला होता. तर, आई-वडील दोघेही कामावर गेले होते. सकाळी ६ वाजेच्या सुमारास भावाने घरी जात दरवाजा ठोठावला. मात्र, वारंवार आवाज देऊनही अनिकेतकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने घरात डोकावून पाहिले असता अनिकेत लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती कळताच उस्मानपुऱ्याचे अंमलदार विजय वाघ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अनिकेतला फासावरून उतरवून घाटी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

नुकताच बारावी उत्तीर्ण झालेला अनिकेत पदवीच्या प्रथम वर्षाला शिकत होता. वडील साखर कारखान्याच्या ट्रकवर चालक असून, आई खासगी रुग्णालयात नर्स आहे. आई रविवारी रात्री रुग्णालयात गेली होती. तर, वडीलही कामावर गेले होते. मित्र व नातेवाइकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत गेल्या काही दिवसांपासून आयफोनसाठी हट्ट करत होता. परंतु, आर्थिक परिस्थिती नसल्याने महागडा मोबाइल घेणे शक्य नसल्याचे घरच्यांनी त्याला समजावूनही सांगितले होते. त्या नाराजीतूनच त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी त्याने आत्महत्येपूर्वी कुठलाही मजकूर लिहिलेला आढळला नाही. त्याचा बंद मोबाइल ताब्यात घेतला असून आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू असल्याचे अंमलदार विजय वाघ यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीMobileमोबाइल