लिंबा : पाथरी तालुक्यातील लिंबा येथून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बस अडवून पाथरी आगाराविषयी संताप व्यक्त केला. लिंबा येथून पाथरी-सोनपेठ बसने शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४० ते ५० आहे. ही बस सकाळी ८.३० वाजता येते विद्यार्थ्यांनी याबाबत पाथरी आगारप्रमुखास लेखी निवेदन देऊन ही बस सकाळी ६.३० वाजता सुरू करण्याची विनंती केली. लेखी आश्वासन देऊनसुद्धा बस वेळेवर न सोडल्याने विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केला. पाथरी-सोनपेठ एम.एच.२०-बी.एल. ११४९ ही बस ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता लिंबा येथे आली असता विद्यार्थ्यांनी ती अडवून ठेवली. पाथरी-सोनपेठ या बसने कानसूरतांडा, डाकूपिंपरी, लिंबा, लिंबा तांडा, आनंदनगर, विटा बु. व सोनपेठ तालुक्यातील वाघलगाव, विटा खुर्द, वाणीसंगम या गावांतील विद्यार्थी- विद्यार्थिनी सोनपेठ येथे शिक्षण घेण्यासाठी जातात. पाथरी आगाराने ही बस सकाळी ६.३० वाजता सोडावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. बस उशिराने येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पाथरी आगारप्रमुख म्हणतात, सदरील विद्यार्थ्यांनी सोनपेठ येथील पास काढल्यामुळे उत्पन्न गंगाखेड आगारास जात आहेत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. गंगाखेड आगाराने सदरील विद्यार्थ्यांची सोय करावी, या दोन्ही आगारांच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. (वार्ताहर)विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सदरील बस उशिराने येत असल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाण्यास उशीर होतो. पर्यायाने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत ओह. पाथरी आगाराच्या वतीने पाथरी-सोनपेठ बस सकाळी ६.३० वाजता सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. निवेदनावर ४० ते ५० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
संतप्त विद्यार्थ्यांनी अडविली बस
By admin | Published: September 07, 2014 12:12 AM