शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
2
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: उद्धव ठाकरेंनी संपूर्ण भारताची माफी मागायला हवी- किरीट सोमय्या
4
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
5
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
6
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
7
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
8
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
9
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...
10
Post Office Time Deposit: पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये पैसे गुंतवलेत? करा फक्त १ काम, मिळेल मूळ रकमेपेक्षा दुप्पट रक्कम
11
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
12
'पाणी' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आदिनाथ म. कोठारे करणार 'या' चित्रपटाचं दिग्दर्शन
13
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
14
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
15
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
16
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
17
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
18
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
19
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
20
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन

श्री सिद्धेश्वर यात्रेत पशु, अश्व प्रदर्शन

By admin | Published: February 27, 2017 12:36 AM

लातूर : लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून मंगळवारी पशु व अश्व प्रदर्शन यात्रेत होणार आहे.

लातूर : लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून देवस्थान, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी पशु व अश्व प्रदर्शन यात्रेत होणार आहे. पशु प्रदर्शनामध्ये देवणी नर व मादी गट, लाल कंधारी नर व मादी गट, संकरीत वासरू गटातील पशूंना सहभागी करून घेतले जाणार आहे. वयोगट शून्य ते १ वर्षापर्यंतचा आणि एक वर्षांपुढील असणार आहे. अश्व गटात तेरा हाताखालील व तेरा हातावरील अश्व असावेत. कुक्कुट गटात देशी व विदेशी असे दोन गट सहभागी करून घेतले जाणार आहेत. शेळी गटात तीन पिले देणारी उस्मानाबादी शेळी असणाऱ्या पशुपालकांना या प्रदर्शनात सहभाग नोंदविता येईल. प्रत्येक गटांतील पशूंना प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर पारितोषिके दिली जाणार आहेत. या प्रदर्शनात जास्तीत जास्त पशुपालकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन देवस्थानचे मार्गदर्शक विक्रम गोजमगुंडे, मुख्य संयोजक ज्ञानोबा कलमे, संयोजक व्यंकटेश हालिंगे, देवस्थानचे सचिव अशोक भोसले, सुरेंद्र पाठक, कोषाध्यक्ष रमेश बिसेन, सुरेश गोजमगुंडे, बच्चेसाहेब देशमुख, ओम गोपे, लातूर मनपाच्या स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे, धनंजय बेंबडे, प्रदीप पाटील खंडापूरकर, उत्तम मोहिते, महादेवअप्पा अंकलकोटे, महादेव खंडागळे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)