औरंगाबाद : अंकित बावणे याच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना बुधवारी बिलासपूर येथे झालेल्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील लढतीत उत्तर प्रदेश संघावर १0५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. नौशाद शेख, ऋतुराज गायकवाड यांची सुरेख अर्धशतकी खेळी आणि आॅफस्पिनर शमशुझमा काझी याची सुरेख गोलंदाजीहेदेखील महाराष्ट्राच्या सलग दुसºया विजयाचे वैशिष्ट्य ठरले.प्रथम फलंदाजी करणाºया महाराष्ट्राने शैलीदार फलंदाज अंकित बावणेच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर ५0 षटकांत ५ बाद ३४३ धावांचा एव्हरेस्ट रचला. महाराष्ट्राकडून अंकित बावणे याने १0६ चेंडूंतच १३ चौकार व एका षटकारासह सर्वाधिक नाबाद ११७ धावांची स्फोटक खेळी केली. त्याला साथ देणाºया नौशाद शेख याने ४७ चेंडूंत ५ चौकार, २ षटकारांसह ६९ धावा केल्या. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ७३ चेंडूंत ३ चौकारांसह ५६, कर्णधार राहुल त्रिपाठी याने ४ चौकारांसह ३१, निखिल नाईक याने १३ चेंडूंतच २३ आणि विजय झोलने ४ चौकारांसह २२ धावांचे योगदान दिले. उत्तर प्रदेशकडून कार्तिक त्यागी आणि सौरभ कुमार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. जबरदस्त फॉर्ममध्ये असणाºया ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्राला सलग दुसºया सामन्यात सुरेख सुरुवात करून देताना विजय झोल याच्या साथीने ३५ चेंडूंत ४0 धावांची सलामी दिली. त्यानंतर त्याने राहुल त्रिपाठीसह दुसºया गड्यासाठी ६७ धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राच्या विशाल धावसंख्येचा मजबूत पाया रचला. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज अंकित बावणे याने चौफेर टोलेबाजी करताना नौशाद शेख याच्या साथीने चौथ्या गड्यासाठी १६.३ षटकांतच १३६ धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर निखिल नाईक याच्या साथीने २३ चेंडूंतच ५0 धावांचा पाऊस पाडताना महाराष्ट्राला ५0 षटकांत ३४३ पर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात उत्तर प्रदेशचा संघ ४३.३ षटकांत २३८ धावांत ढेपाळला. त्यांच्याकडून मोहंमद सैफने सर्वाधिक ५ चौकारांसह ४९ धावा केल्या. मोहसीन खानने ३४, कर्णधार अक्षदीप नाथने ३१, शिवम चौधरीने ३३ व सौरभ कुमारने ३0 धावांचे योगदान दिले. महाराष्ट्राकडून आॅफस्पिनर शमशुझमा काझीने ३८ धावांत ३ गडी बाद केले. त्याला सत्यजित बच्छाव, श्रीकांत मुंढे व प्रदीप दाढे यांनी प्रत्येकी २ गडी बाद करीत साथ दिली.संक्षिप्त धावफलकमहाराष्ट्र : ५0 षटकांत ५ बाद ३४३.(अंकित बावणे नाबाद ११७, नौशाद शेख ६९, ऋतुराज गायकवाड ५६, राहुल त्रिपाठी ३१, निखिल नाईक २३, विजय झोल २२. कार्तिक त्यागी २/७८, सौरभ कुमार २/५१).उत्तर प्रदेश : ४४.३ षटकांत सर्वबाद २३८.(मोहंमद सैफ ४९, शिवम चौधरी ३३, मोहसीन खान ३४, अक्षदीप नाथ ३१, शमशुझमा काझी ३/३८, सत्यजित बच्छाव २/२५, श्रीकांत मुंढे २/४५, प्रदीप दाढे २/६१).
अंकित बावणेचे शानदार शतक; महाराष्ट्राचा उत्तर प्रदेशवर दणदणीत विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:01 AM
अंकित बावणे याच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना बुधवारी बिलासपूर येथे झालेल्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील लढतीत उत्तर प्रदेश संघावर १0५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. नौशाद शेख, ऋतुराज गायकवाड यांची सुरेख अर्धशतकी खेळी आणि आॅफस्पिनर शमशुझमा काझी याची सुरेख गोलंदाजीहेदेखील महाराष्ट्राच्या सलग दुसºया विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
ठळक मुद्देविजय हजारे करंडक : ऋतुराज, नौशाद, शमशुझमा काझी चमकले