औरंगाबाद : मराठवाड्याचे शैलीदार फलंदाज अंकित बावणे, विजय झोल यांच्यासह अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंडे आणि शमशुझमा काझी यांचा महाराष्ट्राच्या ट्वेंटी २0 क्रिकेट संघात समावेश करण्यात आला आहे. राजकोट येथे ७ ते १३ जानेवारीदरम्यान होणाºया सईद अली मुश्ताक अली करंडक टी २0 क्रिकेट स्पर्धेसाठी नुकताच महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. केदार जाधव कर्णधारपद भूषवणार आहे.महाराष्ट्राची सलामीची लढत ७ जानेवारी रोजी गुजरात संघाविरुद्ध होत आहे. ८ रोजी सौराष्ट्र, ११ रोजी मुंबई आणि १३ जानेवारी रोजी बडोदा संघाविरुद्ध सामना होणार आहे.या संघात समावेश करण्यात आलेला औरंगाबादच्या अंकित बावणे याने यंदाच्या हंगामात महाराष्ट्राच्या रणजी संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याचप्रमाणे विजय झोल याच्यासाठीदेखील ही स्पर्धा महाराष्ट्राच्या रणजी संघातील स्थान निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे : केदार जाधव (कर्णधार), राहुल त्रिपाठी (उपकर्णधार), अंकित बावणे, स्वप्नील गुगळे, विजय झोल, ऋतुराज गायकवाड, नौशाद शेख, निखिल नाईक (यष्टीरक्षक), प्रयाग भाटी, दिव्यांग हिंगणेकर, शमशुझमा काझी, डोमेनिक मुथ्थूस्वामी, सत्यजित बच्छाव, जगदीश झोपे, श्रीकांत मुंडे, समद फल्लाह.या संघात निवड झालेल्या मराठवाड्यातील खेळाडूंना एमसीएचे विभागीय सचिव प्रदीप देशमुख, औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे, सहसचिव शिरीष बोराळकर, राजू काणे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
अंकित बावणे, विजय झोल महाराष्ट्राच्या ट्वेंटी २0 संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:50 AM
मराठवाड्याचे शैलीदार फलंदाज अंकित बावणे, विजय झोल यांच्यासह अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंडे आणि शमशुझमा काझी यांचा महाराष्ट्राच्या ट्वेंटी २0 क्रिकेट संघात समावेश करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे श्रीकांत मुंडे, शमशुझमा काझी यांचाही समावेश