लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठा आरक्षणासंदर्भात शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे आजपर्यंत पाच तरुणांनी आत्महत्या केल्या. राज्यभर ठिय्या आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा २४ तासांत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने होत आहेत. मराठा समाज शांततेच्या मार्गाने ठिय्या देत आहे. असे असताना काहीजण राजकीय लाभासाठी या आंदोलनाला हिसंक रूप देत आहेत.या आंदोलनात आतापर्यंत आपल्या पाच बांधवांचे बळी गेले. आरक्षणाची मागणी आपल्या भविष्यासाठी आहे. त्यामुळे कोणीही आत्महत्येचे पाऊल उचलू नये, शांततेच्या मार्गाने आपल्याला आंदोलन सुरूच ठेवायचे आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करू नये, असे आवाहनही या पत्रकार परिषदेत करण्यात आले.
२४ तासांत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 1:00 AM