औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर, अभियांत्रिकी, आयटीआय अभ्यासक्रमांच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाला गुरुवारपासून सुरुवात झाली. तर अकरावीची पहिली फेरी शुक्रवारी जाहीर होणार आहे. तंत्रनिकेतनची पहिली फेरी १६ जुलै रोजी जाहीर होईल.- अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर गुरुवारपासून पहिल्या फेरीतील प्रवेशाला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरातील शासकीय अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयात अॅडमिशन रिपोर्टिंग सेंटर (एआरसी) उभारण्यात आले आहे. याठिकाणी प्रवेशनिश्चिती करावी लागणार आहे. प्रवेशनिश्चिती १५ जुलैपर्यंत करता येणार आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात विविध ठिकाणी एआरसी केंद्र उभारण्यात आले आहेत.- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या रखडलेल्या प्रवेश प्रक्रियेला गुरुवारी मुहूर्त लागला. विविध विभागांनी घेतलेल्या प्रवेश परीक्षांनुसार प्रवेशाची पहिली यादी जाहीर केली. यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात केली. पहिल्या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर केली जाणरा आहे.- राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात अकरावी प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करण्यात येत आहे. या प्रवेशाच्या नोंदणीनंतर पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी (दि.१२) जाहीर केली जाणार आहे. औरंगाबाद शहरातील ११० उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील २९ हजार १०० जागांवर ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दहावीचा निकाल जाहीर करून महिना उलटून गेला आहे. यानंतर अकरावी प्रवेशाची यादी जाहीर असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे.- शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचे प्रवेश हे केंद्रीय आॅनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. आयटीआयची पहिली गुणवत्ता फेरी गुरुवारी जाहीर झाली. शासकीय आयटीआयमध्ये पहिल्या दिवशी ९१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. औरंगाबादच्या शासकीय आयटीआयमध्ये २९ ट्रेडच्या १ हजार ११६ जागा असून, पहिल्या दिवशी ९१ जागांवर प्रवेश झाले. ही प्रवेश प्रक्रिया १५ जुलैपर्यंत चालणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रांसह निर्धारित वेळेत प्रवेश घेण्याचे आवाहन प्राचार्य अभिजित आल्टे यांनी केले.- राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयांत प्रवेशासाठी पहिल्या फेरीतील संवर्गनिहाय जागाची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. १२ ते १४ जुलैदरम्यान आॅप्शन फॉर्मचे कन्फर्मेशन करावे लागणार आहे. यानंतर १६ जुलै रोजी पहिल्या फेरीची यादी जाहीर केली जाईल.----------
अभियांत्रिकीची पहिली फेरी जाहीर; विद्यापीठातील प्रवेश सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:30 AM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर, अभियांत्रिकी, आयटीआय अभ्यासक्रमांच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाला गुरुवारपासून सुरुवात झाली. तर अकरावीची पहिली फेरी शुक्रवारी जाहीर होणार आहे. तंत्रनिकेतनची पहिली फेरी १६ जुलै रोजी जाहीर होईल.
ठळक मुद्देमिशन अॅडमिशन : अकरावीची आज जाहीर होणार पहिली फेरी; आयटीआय प्रवेशाला सुरुवात