छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात काही जिल्ह्यांत येत्या २७ एप्रिलपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या अंदाजामुळे वार्षिक धान्य खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. यामुळे मागील वर्षीपेक्षा यंदा धान्य, तांदूळ, डाळींची निम्म्याने उलाढाल कमी झाली आहे.
धान्य खरेदीचा पावसाशी काय संबंधआता तुम्ही म्हणाल की, पावसाच्या अंदाजाचा व धान्य खरेदीचा काय संबंध ? अहो, ‘मार्च, एप्रिल, मे’ महिन्यात वार्षिक धान्य खरेदीनंतर ते धान्य कडक उन्हात वाळवायला टाकावे लागते. एकदा धान्य कडक उन्हात वाळविले की, नंतर वर्षभर कीड लागत नाही. नेमके याचवेळी पाऊस पडला तर धान्याला कडक ऊन देता येणार नाही. धान्य गच्चीवर वाळत घातले व पाऊस आला तर धान्य भिजेल व कीड लवकर लागेल. यामुळे ग्राहक धान्य खरेदी टाळत आहेत.
धान्याचे होलसेल भाव महिनाभरापासून स्थिरप्रकार किंमत (किलो)गहू २६-३३ रु. शरबती गहू ४२ -४८ रु. ज्वारी ३६ - ४४ रु. सोलापूर ज्वारी ४५ - ५० रु. तूरडाळ - ११३-१२० रु. हरभरा डाळ ६०-६५ रु. मसूर डाळ ७५-८० रु. मूगडाळ १०५-११५ रु. उडीदडाळ ९५-१०५ रु. मठ डाळ ९८-१०८ रु. तांदूळ ४०-११२ रु.
‘मे’ महिन्याचा मुहूर्त काही ग्राहकांनी वार्षिक धान्य खरेदी केली आहे. कारण, अवकाळी पावसाने गव्हासह अन्य पिकांचे नुकसान झाले. पुढील महिन्यात भाव वाढतील, या अंदाजाने त्यांनी धान्य खरेदी केले. पण, काही ग्राहक ‘मे’ महिन्यात वार्षिक धान्य खरेदी करणार आहेत.- नीलेश सोमाणी, होलसेल व्यापारी