शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

ऐनवेळी आणखी एक वादग्रस्त ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 1:37 AM

महापालिकेतील एका अधिका-यास बडतर्फ काळातील आर्थिक लाभ देण्यात यावेत, या मागणीचा प्रशासकीय ठराव १६ आॅक्टोबर रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत ऐनवेळी येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेतील एका अधिका-यास बडतर्फ काळातील आर्थिक लाभ देण्यात यावेत, या मागणीचा प्रशासकीय ठराव १६ आॅक्टोबर रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत ऐनवेळी येणार आहे. यापूर्वी महापौर बापू घडमोडे यांनी हाच प्रस्ताव अशासकीय स्वरूपात ऐनवेळी मंजूर करून घेतला होता. वर्तमानपत्रांमध्ये यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध होताच ठराव रद्द करून ‘अगा जे घडलेच नाही’ असा आव आणण्यात आला होता.२० जुलै २०१७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळीत अनेक ठराव घुसडण्यात आले. सोयीचे ठराव मंजूर झाल्याचे दाखविण्यासाठी ठराव क्रमांक ११९२ असा दाखवून उर्वरित ठराव ११९२ आॅब्लिक १ ते ४ असे दाखविण्यात आले आहेत. महापालिकेच्या सभा कामकाज नियमावलीत अशा पद्धतीने ठराव मंजूर होतच नाहीत.नियम धाब्यावर बसवून मागील काही दिवसांपासून मनपा सभागृहाचे कामकाज सुरू आहे. २० जुलैच्या सभेत एका बडतर्फ अधिका-याला २०१२ ते २०१६ पर्यंतचे आर्थिक लाभ देण्यात यावेत, असा एक ठराव मंजूर झाला होता. या गुपचूप ठरावाची चर्चा बरीच झाल्याने महापौरांनी तो रद्द करून टाकला. आता हाच प्रस्ताव प्रशासनातर्फे सादर करण्यात येत आहे. सोमवार, १६ आॅक्टोबर रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत ऐनवेळीत हा ठराव येणार आहे. नगरसचिव विभागाने हा प्रस्ताव स्वीकारल्याचे कळते. बडतर्फ अधिका-यांना शासन आदेशानुसार परत मनपा सेवेत घेण्यात आले आहे.शासनाकडे आर्थिक लाभ मिळविण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. शासनाकडून काहीच होत नसल्याने शेवटी मनपा सर्वसाधारण सभेकडून आर्थिक लाभ मिळविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.