शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

समृद्धीनंतर आणखी एक राष्टÑीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 1:40 AM

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गानंतर जालना जिल्ह्यातून मुंबई ते कोलकता हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गानंतर जालना जिल्ह्यातून मुंबई ते कोलकता हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. त्यामुळे एकीकडे जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना फायदा होणार असून, रोजगाराच्या संधीबरोबरच दळणवळण अधिक गतिमान होणार आहे. तर दुसरीकडे रस्त्यासाठी जमीन संपादन कळीचा मुद्दा ठरणार आहे.भारतमाला प्रकल्पांतर्गत देशात उभारण्यात येणा-या ४४ पैकी बारा आर्थिक कॉरिडॉरमधील महाराष्ट्रातून जाणार आहेत. यातील मुंबई ते कलकत्ता हा एक हजार ८५४ हा राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतून जाणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गही जालना जिल्ह्यातून ४२ किलोमीटरवरून जाणार आहे. समृद्धीसाठी जिल्ह्यातील ५१२ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे.सध्या समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन करताना राज्य शासनाला अनेक अडचणी येत आहेत. जमिनीसाठी देण्यात आलेल्या मोबदल्यामध्ये जिल्हानिहाय मोठी तफावत असल्याने जालना जिल्ह्यातील शेतक-यांमधून समृद्धीस जमीन देण्यास विरोध होत आहे. असे असतानाही आणखी एक राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जाणार असल्याने यासाठी किती जमीन संपादित होणार, मोबदला किती मिळेल, हे मुद्दे शेतक-यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, मुंबई-कोलकता राष्ट्रीय महामार्ग सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरूनच बनविण्यात येणार आहे. त्यामुळे यासाठी अधिकची जमीन न घेता केवळ रस्ता रुंदीकरणासाठी सध्याच्या रस्त्यालगतची जमीन संपादित केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग होत असताना आणखी एक महामार्ग कशासाठी, असा सवाल येथील शेतकरी हक्क बचाव व कृती समितीच्या पदाधिका-यांनी उपस्थित केला आहे.प्रस्तावित मुंबई-कोलकता राष्ट्रीय महामार्गाचे अंतर एक हजार ८५४ किलोमीटर राहणार आहे. सध्या मुंबई ते कोलकता हे अंतर सुमारे एक हजार ९७३ किलोमीटर इतके आहे. नव्या महामार्गात हे अंतर १२० किमीने कमी होणार आहे.हा महामार्ग मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव, कारंजा, अमरावती, नागपूर, रायपूर, संभळपूर, देवगड, खरगपूरमार्गे कोलकता असा असेल. यास राष्ट्रीय महामार्ग ‘एनएच सहा’असे नाव देण्यात आले आहे.