शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा नोटांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 1:15 PM

MIM MP Imtiaz Jalil: एमआयएमचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजेद यांच्या भाचीच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल

औरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे खा. इम्तियाज जलील ( MIM MP Imtiaz Jalil ) यांच्यावर शनिवारी एका लग्नसमारंभात चक्क नोटांचा वर्षाव करण्यात आला. बुलडाण्याच्या नगराध्यक्षा झेबुन्नीसा यांचे पती तथा स्वीकृत नगरसेवक सज्जादभाई आणि इतर उपस्थितांनी हा नोटवर्षाव केला (another rain of notes on MIM MP Imtiaz Jalil) . सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला. खा. जलील यांच्यावर नोटा उधळण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी एमआयएमच्या ( AIMIM ) कार्यकर्त्यांनीही नोटा उधळल्या होत्या.

एमआयएमचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजेद यांच्या भाचीचे लग्न रविवारी मोठ्या थाटामाटात झाले. लग्नाच्या पूर्वसंध्येला आयोजित विविध (सांचक) कार्यक्रमाला खा. जलील विशेष निमंत्रित होते. सह्याद्री लॉनवरील हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत रंगला. कव्वालीही सुरू झाली. कव्वाल आणि त्यांच्या वादक संचावर पैशांचा वर्षाव सुरू होता. नरवदेवाला भेटण्यासाठी व्यासपीठावर जलील आले. ते पाहून कव्वालाने अधिक उत्साहाने ‘हसीनो की जुल्फ लहराये’...ही कव्वाली सादर केली. व्यासपीठावर उपस्थित बुलडाण्याच्या नगराध्यक्षा झेबुन्नीसा बेगम यांचे पती सज्जादभाई यांनी नोटांचा वर्षाव सुरू केला. कोरोना नियमांकडे पाठ फिरवीत एकानेही मास्क घातला नव्हता.

नोटा उधळणे ही परंपरा...लग्न, कव्वाली आदी कार्यक्रमांतून नोटा उधळण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. शनिवारी माझ्यावरही नोटा उधळल्या. या नोटा कोण जमा करतं, हेसुद्धा बघायला हवे. कोरोनाच्या लाटेत कव्वाल आणि त्यांचे वादक संच त्रस्त होता. त्यांना आज यानिमित्ताने चार पैसे मिळत आहेत. बुलडाण्याच्या नागरिकांनी पैसे उधळले. यामध्ये मला चुकीचे काहीच वाटत नाही. उलट यानिमित्ताने गरिबांचा फायदा झाला.- इम्तियाज जलील, खासदार, एमआयएम.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनImtiaz Jalilइम्तियाज जलील