लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या सेवेतून चार वर्षे बडतर्फ झालेल्या एका अधिकाºयाला अलीकडेच रुजू करून घेण्यात आले. बडतर्फ काळातील पगार संबंधित अधिकाºयाला मिळावा, असा चमत्कारिक ठराव महापौर बापू घडमोडे यांनी २० जुलैच्याच सभेत ऐनवेळच्या प्रस्तावामध्ये घेतल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे घडमोडेंची आणखी एक ‘सेटिंग’ समोर आली आहे. आता हा ठराव सभा कामकाज नियमावलीतून बाहेर काढण्यासाठी महापौरांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.२० जुलै रोजी महापौरांनी कोणालाही न सांगता मालमत्ता कर वसुली, कचरा उचलण्याचे खाजगीकरण हे दोन महत्त्वाचे ठराव घेतल्याचे आतापर्यंत उघड झाले होते. याच सभेत ऐनवेळीमध्ये आणखी एक ठराव घुसडण्यात आल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. महापालिकेतील एका अधिकाºयाला २०१२ मध्ये थेट बडतर्फ करण्यात आले होते. तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी हा निर्णय घेतला होता. बडतर्फ अधिकाºयाला मागील वर्षी एका दिवसात सेवेत रुजू करून घेण्यात आले. चार वर्षे बडतर्फ असलेल्या अधिकाºयाला त्या काळातील पगार देण्यात यावा, असा ठराव २० जुलैच्या सभेत महापौरांनी घेतला. ही रक्कम लाखोंच्या घरात जात आहे. महापौरांनी मंजूर केलेल्या ठरावाचा कारणापुरता उताराही तयार करण्यात आला. अंमलबजावणीसाठी तो प्रशासनाला (पान २ वर)
घडमोडे यांची आणखी एक ‘सेटिंग’ उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 1:06 AM