लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एम. पी. एड. अभ्यासक्रमाच्या परीक्षांना मंगळवारपासून (दि.२४) सुरुवात झाली. विजयेंद्र काबरा महाविद्यालयात परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्याची पर्यवेक्षकाने दोनदा कॉपी पकडली. तिस-यांदा कॉपी पकडताच त्या विद्यार्थ्याने पर्यवेक्षकाच्या कानशिलात लगावली आणि तात्काळ हॉलबाहेर येऊन तिस-या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. या विद्यार्थ्यावर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात एम.पी.एड. अभ्यासक्रमाचा ‘अप्लाईड स्टॅटिस्टिक्स इन फिजिकल एज्युकेशन अॅण्ड स्पोर्टस्’ या विषयाची परीक्षा सकाळी १० ते १ या वेळेत सुरू होती. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागातील ‘एमपीसीसी २०१’ या परीक्षा क्रमांकाचा विद्यार्थी हॉल क्रमांक ४० मध्ये परीक्षा देत होता. या विद्यार्थ्याची पर्यवेक्षकाने दोन वेळा कॉपी पकडली. दोन्ही वेळा त्याला समज देऊन सोडण्यात आले. याच विद्यार्थ्याची १२ वाजून ६ मिनिटाला तिसºयांदा कॉपी पकडली. तेव्हा त्या विद्यार्थ्याने थेट पर्यवेक्षक सुहास गिरी यांच्या गालावर चापट लगावली. यामुळे एकच खळबळ उडाली. तेवढ्यात या विद्यार्थ्याने परीक्षेच्या हॉलबाहेर धाव घेऊन तिसºया मजल्यावरून खाली उडी मारण्यासाठी कठड्यावर चढला. पर्यवेक्षकासह इतर परीक्षार्थी धावत बाहेर आले. त्यांनी उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या त्या विद्यार्थ्याला पकडले. त्यास वर ओढून प्राचार्यांच्या कॅबीनमध्ये नेले. प्राचार्य डॉ. सतीश सुराणा यांनी क्रांतीचौक पोलिसांना माहिती दिली. १० मिनिटांच्या आत पोलिसांची गाडी तेथे दाखल झाली. पकडलेल्या विद्यार्थ्याला पोलिसांकडे दिल्याचे डॉ. सुराणा यांनी सांगितले.क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रारविजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराची तक्रार प्राचार्य डॉ. सतीश सुराणा यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात दिली. तसेच विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनाही माहिती देण्यात आली.विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा मागील महिनाभरापासून सुरू आहेत. यात एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात कॉपी करताना पकडल्यामुळे त्या विद्यार्थ्याने चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. मागील आठवड्यात शनिवारी डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालयातही कॉपी पकडताच विद्यार्थ्याने उडी मारण्याचा ड्रामा केला. मंगळवारी पुन्हा विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात गंभीर प्रकार घडला.विद्यापीठाने डॉ.विक्रम खिलारे यांच्या भरारी पथकाला महाविद्यालयात जाण्याच्या सूचना दिल्या. तसेच परीक्षा संचालकांनीही परीक्षा केंद्राला उशिरा भेट दिली...कॉपी पकडल्याचा राग मनात धरून थेट पर्यवेक्षकाला मारहाण करण्यापर्यंत परीक्षार्थीनी मजल मारली. ही धक्कादायक बाब आहे. विशेष म्हणजे हा विद्यार्थी विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागाचा विद्यार्थी आहे. या प्रकारामुळे महाविद्यालयात परीक्षा हॉलवर पर्यवेक्षक म्हणून जाण्यास प्राध्यापक तयार होणार नाहीत. यापुढे कोणत्याही प्रकारचे परीक्षा केंद्र घेणार नसल्याचे पत्र विद्यापीठ प्रशासनाला देणार आहे.-डॉ. सतीश सुराणा, प्राचार्य व परीक्षा केंद्र संचालक
औरंगाबादेत आणखी एका विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:21 AM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एम. पी. एड. अभ्यासक्रमाच्या परीक्षांना मंगळवारपासून (दि.२४) सुरुवात झाली. विजयेंद्र काबरा महाविद्यालयात परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्याची पर्यवेक्षकाने दोनदा कॉपी पकडली. तिस-यांदा कॉपी पकडताच त्या विद्यार्थ्याने पर्यवेक्षकाच्या कानशिलात लगावली आणि तात्काळ हॉलबाहेर येऊन तिस-या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. या विद्यार्थ्यावर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ठळक मुद्देविजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयातील प्रकार : कॉपी पकडणाऱ्या पर्यवेक्षकाला केली मारहाण; विद्यापीठातील विभागाचा विद्यार्थी