शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

ॲंटिजन तपासणी निष्प्रभ; आरटीपीसीआर बेस्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 5:03 PM

आरोग्य विभागाने मागील काही दिवसांमध्ये तपासण्यांची संख्या कमी केली.

ठळक मुद्देॲंटिजन : ८२ हजारांमध्ये फक्त ९८ बाधितआरटीपीसीआर : २८ हजारांमध्ये ६२६ बाधितजुलैमध्ये एकूण बाधित-४३३ऑगस्टमध्ये एकूण बाधित-२९१

औरंगाबाद : कोरोनाचा ( Corona Virus ) संसर्ग पूर्णपणे कमी झालाय असे आभासी चित्र निर्माण करण्यात आले आहे. शहरात ८० टक्के ॲंटिजन तपासण्या होत आहेत. त्यांचा निकाल ९९ टक्के नकारार्थी आहे. २० टक्के आरटीपीसीआर तपासण्यात होत असून, त्यात १० टक्क्यांहून अधिक रुग्ण बाधित आढळत आहेत.

प्रशासनाकडून (  Aurangabad Municipal Corporation ) आजही फेक ॲंटिजन ( Antigen Test ) तपासण्यांवर भर दिल्या जातोय. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेत संसर्ग अधिक ( Corona Third Wave ) वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ‘लोकमत’ने जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या आकडेवारीची सखोल माहिती घेतली असता धक्कादायक चित्र समोर आले. बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांच्या तपासण्या जवळपास बंदच झाल्या आहेत.शहराचा पॉझिटिव्हिटी रेट अत्यंत कमी असल्याचे महापालिका प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात आले. आरोग्य विभागाने मागील काही दिवसांमध्ये तपासण्यांची संख्या कमी केली. ॲंटिजन तपासण्यांवर सर्वाधिक भर दिला. नागरिकांनी मागणी केली तरच आरटीपीआर तपासण्या होत आहेत. त्यामुळे बाधित रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत आहेत. ही दिशाभूल का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

जुलैमधील तपासण्याजुलै महिन्यात महापालिकेने शहरात ॲंटिजनच्या ३४ हजार ९४२ तपासण्या केल्या. त्यामध्ये शहरातील ४० बाहेरगावचे ९ असे एकूण ४९ बाधित रुग्ण आढळून आले. याच महिन्यात आरटीपीसीआर तपासण्या फक्त १३ हजार ८८ झाल्या. त्यामध्ये बाधित ३८४ आढळले. दोन्ही चाचण्यांचे मिळून एका महिन्यात ४३३ बाधित सापडले.

ऑगस्टमधील तपासण्या१ ते ३१ ऑगस्टपर्यंत ॲंटिजनच्या ४८ हजार २७ तपासण्या झाल्या. त्यात मनपा हद्दीतील ३० बाहेर आणि गावी राहणारे १९ बाधित आढळले. या महिन्यात आरटीपीसीआर तपासण्या १५ हजार ५३५ केल्या. त्यात तब्बल २४२ बाधित सापडले. या महिन्यातील बाधितांची संख्या २९१ पर्यंत पोहोचली.

बाधितांच्या नातेवाइकांची तपासणी शुन्यमहापालिका हद्दीत एखादा नागरिक कोरोना बाधित आढळल्यावर त्याच्या संपर्कातील हाय रिस्क, लो रिस्क लोकांच्या कोरोना तपासण्या करण्याचे काम मनपाच्या आरोग्य विभागाचे आहे. मागील काही महिन्यांपासून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ही पद्धतच बंद पडली आहे. ज्या भागात रुग्ण राहतात त्या वॉर्डाच्या मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयातून निरोप देण्यात येतो. वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या नातेवाइकांना जवळील तपासणी केंद्रावर जा तपासण्या करून घ्या, असे सांगतात. एकही नातेवाईक तपासणीसाठी पुढे येत नाही.

आता तपासणी संख्याच घटली१ सप्टेंबरपासून मनपाने ६१४ कंत्राटी कर्मचारी कमी केले. याचा परिणाम तपासण्यांवर दिसून येतो आहे. ३१ ऑगस्टपूर्वीपर्यंत शहरात दररोज साडेतीन हजार तपासण्या होत होत्या. आता ही संख्या अवघ्या २०० ते ३०० पर्यंत खाली आली. रेल्वेस्टशन, विमानतळ, विविध शासकीय कार्यालये, शहरात दाखल होणारे नागरिक आणि शहरात मोबाइल पथकांकडून तपासण्या करण्यात येतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCorona vaccineकोरोनाची लसAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका