शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

फुलंब्री बाजार समितीच्या सभापतीपदी अनुराधा चव्हाण बिनविरोध; जिल्ह्यात प्रथमच महिलेस संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 7:32 PM

उपसभापतिपदी दत्तात्रय करपेंची बिनविरोध निवड 

फुलंब्री : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनुराधा अतुल चव्हाण तर उपसभापतीपदी दत्तात्रय करपे यांची बिनविरोध निवड झाली. आज दुपारी ४ वाजता  बाजार समिती सभागृहात निवडणूक पार पडली.

फुलंब्री बाजार समितीची ३० एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात आली यात भाजपा -शिवसेना शिंदे गटाला १८ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या. तर एक जागा कॉंग्रेस पक्षाला, शिवसेना शिंदे गटाला दोन जागा तर एकजण अपक्ष निवडून आलेला आहे. अशा प्रकारे भाजप -शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात बाजार समिती आहे. 

आज सकाळी बाजार समिती सभागृहात सभापती -उपसभापती यांची निवड प्रक्रिया सुरु झाली. सभापती पदासाठी भाजपच्या अनुराधा चव्हाण ,तर शिवसेना  शिंदे गटाचे दत्तात्रय करपे यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी कॉंग्रेस पक्षाचा निवडून आलेला एकमेव संचालक वरुण पाथ्रीकर हे निवड प्रक्रियेत गैरहजर होते. एकूण १८ संचालक पैकी १७ संचालक हजर होते. दोन पदासाठी दोनच अर्ज आल्याने निवडणूक  बिनविरोध झाली. 

आमदार हरिभाऊ बागडे यांनी नवनियुक्त सभापती -उपसभापती यांचे स्वागत केले. याप्रसंगी दामुअण्णा नवपुते ,माजी सभापती किर्शोर बलांडे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास सिरसाठ, शिवाजीराव पाथ्रीकर, सविता फुके, जितेंद्र जैस्वाल, विवेक चव्हाण, बाळसाहेब तांदळे, सरला संतोष तांदळे, अप्पासाहेब काकडे, योगेश मिसाळ, गजानन नागरे, कृष्णा गावंडे, हौसाबाई काटकर, नरेंद्र देशमुख, सर्जेराव मेटे, ज्ञानेश्वर फलके, शिवाजी खरात ,जगन दाढे ,सूचित बोरसे,पंडितराव जाधव,योगेश जाधव,मयूर कोलते ,रवींद्र काथार ,बाबसाहेब सिनगारे आदि सह अनेकांची उपस्थिती होती. 

पहिल्या महिला सभापती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आता पर्यंत सहकार क्षेत्रात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी महिलांची वर्णी लागलेली नव्हती. या क्षेत्रात आता अनुराधा चव्हाण यांच्या रूपाने  महिलांनी प्रवेश केला असून बाजार समितीची धुरा त्या सांभाळणार आहे पहिल्या महिला सभापती होण्याचा मान हि त्यांनी मिळविला आहे या क्षेत्रात त्या नवख्या असल्या तरी त्या बाजार समितीचा कारभार चालवून संस्थेला विकासाकडे घेऊन जातील अशी आपे अपेक्षा तालुक्यातील नागरिकांची आहे 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmarket yardमार्केट यार्ड