तालुक्यात एकूण रुग्णसंख्या २ हजार १२५ असून १ हजार ९७४ रुग्ण बरे झालेत. ३६ रुग्णांचा आतापर्यंत तालुक्यात कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या शहरातील ७२ व ग्रामीण भागातील ४३ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली होती; मात्र १५ फेब्रुवारीनंतर रुग्ण संख्या झपाट्याने वाढली असल्याचे समोर आले आहे. शहरात १२८ रुग्ण अलीकडच्या काही दिवसात वाढले आहेत. शहरात पोलीस स्टेशन, पंचायत समिती, न्यायालय, वसंत क्लब येथे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली असून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. वसंत क्लब कोरोनामुळे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुरुनाथ इंदूलकर यांनी केले आहे.
वैजापुरात रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:05 AM