औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुन्हा कोरोना रुग्ण वाढत असताना उच्चांकी २३० रुग्णांची रविवारी भर पडली. औरंगाबाद तालुक्यात तब्बल ९८, गंगापूर तालुक्यात ३९, तर वैजापूर तालुक्यात ३२ कोरोनाबाधित रुग्णांसह ग्रामीणमध्ये २३० रुग्णांची भर पडली. त्यामुळे उपचार सुरू रुग्णांची संख्या साडेनऊशे पार गेली. त्यात औरंगाबाद तालुक्यात ३६६, फुलंब्रीत २३, गंगापूर १६२, कन्नड ९४, खुलताबाद २६, सिल्लोड ६१, वैजापूर १६६, पैठण ५०, तर सोयगाव तालुक्यात ४ रुग्णांवर, असे ९५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सोमवारपासून आठवड्यात सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ५१ आरोग्य केंद्रांतील लसीकरण वाढविण्यासह जिल्ह्यात दररोज १ हजारहून अधिक तपासण्या केल्या जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके यांनी सांगितले. ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढविण्यावर भर दिला जाणार असून, आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटरची वाढ करीत आहोत. सध्या ११ सेंटर सुरू असून, आवश्यक तिथे केंद्रांची प्राथमिक तयारी करून ठेवण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सुरुवातीला केवळ तालुक्याची गावे व मोठ्या बाजारपेठांच्या गावातील संक्रमण हळूहळू ग्रामीण व दुर्मग गावांतही पसरत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
पाॅझिटिव्हिटी रेट वाढतोय
एक मार्चला ग्रामीण भागात तपासणीत पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याचा दर १२.२१ टक्के होता. १३ मार्चला हा दर वाढून १२.४४ वर पोहोचला, तर गेल्या सात दिवसांचा डबलिंग रेट १२४ झाला आहे. एक मार्चला हा दर ३७५.७५ होता.
--
ग्रामीणचा वाढता आलेख
दिनांक : बाधित रुग्ण
१० मार्च ८९
११ मार्च २२३
१२ मार्च ११२
१३ मार्च १२५
१४ मार्च २३०