छत्रपती संभाजीनगर : प्राचीन काळापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत महिलांवर सातत्याने अन्याय, अत्याचार होत आहेत. त्यांना सतत दुय्यम दर्जा दिला जातो. पुरूषांनी स्त्रियांना प्रत्येक काळामध्ये गुलामीत ढकलले म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलांच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, स्त्रियांनाच त्यांचे हक्क कधीच कळले नाहीत. त्या पुरुषी मानसीकेततुन बाहेरच पडल्या नाहीत. सध्या समान नागरी कायदा येत आहे. त्यामध्ये महिलांच्या न्याय हक्कासाठी समान नागरी कायदा हवा असे प्रतिपादन कायद्याच्या अभ्यासक डॉ. अपर्णा कोत्तापल्ले यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक अध्ययन संस्थेच्या ७ वार्धपन दिनानिमित्त दोन विशेष व्याख्यानाचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात नुकतेच केले होते. त्यात डॉ. कोत्तापल्ले यांनी 'समान नागरी कायदा: सामाजिक आणि कायदेशीर मुल्यांकन' या विषयावर मार्गदर्शन केले. दुसरे पुष्प प्रा. श्रीकिसन मोरे यांनी 'समान नागरी कायदा व भारतीय राज्यघटना' या विषयावर गुंफले. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य आर.के.क्षीरसागर होते. यावेळी प्रा. मोरे म्हणाले, संविधानातील तत्वज्ञानाच्या आधारावर सामान नागरी कायदा असावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी प्राचार्य क्षीरसागर यांनी संस्थेच्या कार्याचा अहवाल सादर केला. प्रस्ताविक प्राचार्य डॉ. यशवंत खडसे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय पाईकराव यांनी तर आभार डॉ. प्रज्ञा साळवे यांनी मानले. कार्यक्रमाला प्राचार्य प्रमोद हेरोडे, डॉ. किशोर साळवे, डॉ.संजय मून, भिमराव सरवदे, अनिल करते, तिलोत्तमा झाडे, डॉ. रवि खिल्लारे, बाबुराव बनसोडे, धनराज गोंडाणे, डॉ. रेखा वाघ, डॉ.मुरलीधर इंगोले आदी उपस्थित होते.