लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाले त्याला निधी देण्याऐवजी अधिकाºयांनी ग्रा.पं. सदस्यालाच निधी दिल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे खुलताबाद पंचायत समितीत खळबळ उडाली असून गटविकास अधिकाºयांनी संबंधित शाखा अभियंता व आॅपरेटरला नोटिसा बजावल्या आहेत.खुलताबाद तालुक्यातील कानडगाव येथे शासनाने २०१६-१७ मध्ये विठाबाई उत्तम साबळे यांना घरकूल मंजूर केले. तशी यादी पंचायत समितीच्या नोटीस बोर्डावरही लावली होती. याबाबतची माहिती विठाबाई साबळे यांना होती. परंतु कानडगाव ग्रा.पं.च्या सदस्या सीताबाई विठ्ठल साबळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या काही अधिकाºयांना हाताशी पकडून कागदपत्रांची हेराफेरी करत तीन टप्प्यात १ लाख २० हजार रुपयांचा निधी आपल्या पदरी पाडून घेतला.वास्तविक पाहता विठाबाई साबळे यांना मंजूर झालेले घरकूल स्वत: सीताबाई विठ्ठल साबळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून विठाबाई यांना सदर लाभापासून वंचित ठेवल्याने या प्रकरणी विठाबाई साबळे यांनी १२ डिसेंबर रोजी खुलताबादच्या गटविकास अधिकाºयांना भेटून हा गैरप्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.सदरील प्रकरणात घरकूल योजनेच्या चुकीच्या लाभाबद्दल संबधित शाखा अभियंता, ग्रामसेवक, आॅपरेटर यांना जबाबदार धरून शासनाचा निधी आपणाकडून वसूल का करण्यात येऊ नये, याबाबतच्या नोटीसा देऊन लेखी खुलासा गटविकास अधिकाºयांनी मागितला आहे. नसता नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.घरकुल लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूकखुलताबाद पंचायत समिती कार्यालयाअंतर्गत तालुक्यातील मंजूर झालेल्या घरकुलाच्या लाभार्थ्यांना मंजुरीपासून तर अंतिम हप्ता निधी मिळेपर्यंत सर्वच अधिकारी, कर्मचारी, अभियंते हजार,पाचशे रूपयांची मागणी करतात.नाही दिले तर लवकर चेक न काढणे, काम न करणे यासह विविध प्रकारचा छळ केला जातो. त्यामुळे या सर्व प्रकाराला कंटाळून लाभार्थी सर्वांना चिरिमिरी देतो. या प्रकाराबाबत अनेकदा वरिष्ठ अधिकाºयांकडे तक्रारी करूनही हा प्रकार सर्रास सुरू आहे. घरकुलाचे चेक काढण्यासाठी लाभार्थ्यांची मोठी आर्थिक पिळवणूक केली जात आहे. याकडे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
घरकुल योजनेची मंजुरी एकाला, लाभ दुस-याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:00 AM