शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
5
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
6
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
7
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
8
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
9
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
10
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
11
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
12
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
13
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
14
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
15
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
16
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
17
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
18
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
19
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

ठेकेदारांच्या मनमानीने दोन महिन्यांत पाच मृत्यू; पोलिसांच्या ‘एनओसी’ शिवायच कामे सुरू

By सुमित डोळे | Published: October 08, 2024 12:13 PM

भर रस्त्यात कुठल्याही वेळेत काम करणे, साहित्य ठेवून आवश्यक उपाययोजना करत नसल्याचे दिसते.

छत्रपती संभाजीनगर : शहरात सुरू असलेल्या शासकीय कामांच्या ठेकेदारांकडून निष्काळजीपणा केला जात आहे. वारंवार बजावून एकाही कामाची एनओसी वाहतूक पोलिसांकडून घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. भर रस्त्यात कुठल्याही वेळेत काम करणे, साहित्य ठेवून आवश्यक उपाययोजना करत नसल्याचे दिसते. परिणामी, गेल्या दोन महिन्यांत पाच नागरिकांचे जीव गेले. विशेष म्हणजे, मनपाने दिलेल्या कंत्राटदार कंपनीमुळे म़ृत्यूची ही दुसरी घटना आहे.

उलट बाजूने सुसाट जाणाऱ्या स्काॅर्पिओच्या (एमएच ०६ -एएन- ८०७६) धडकेत ६ ऑक्टोबरला मध्यरात्री १ वाजता हेमंत पाखरे (रा. पदमपुरा), राहुल लोदी (रा. केशरसिंगपुरा) या दोन मित्रांचा मृत्यू झाला. सातारा पोलिस ठाण्यात पसार स्कॉर्पिओचालक व जलवाहिनीच्या काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानुभाव चौकाकडून रेल्वेस्थानक रस्त्यावर जीव्हीपीआर कंपनीकडून जलवाहिनीचे काम सुरू आहे. कंपनीने मात्र कुठल्याच स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिसांना याबाबत कुठलीच कल्पना दिली नाही. दिशादर्शक फलक न लावता एक रस्ता बंद करून वाहतूक रॉंग साइडने वळवली. सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना किंवा सुरक्षारक्षक तैनात केला नाही.

ठेकेदारांचा मनमानी कारभारजीव्हीपीआर कंपनीकडून शहरात ठिकठिकाणी जलवाहिनीचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारे पाइप संपूर्ण शहरातील मुख्य चौक, रस्त्यांवर धोकेदायकरित्या थर रचून ठेवण्यात आले आहे. अन्य रस्त्यांच्या कामात देखील बेजबाबदारपणे खड्डे खोदून, तसेच सोडले जातात.

यापूर्वी ठेकेदारामुळे मृत्यू- जगन्नाथ कुलकर्णी (रा. नारेगाव) यांचा मुकुंदवाडी एसटी वर्कशॉप ते फॅक्सोप्लास कंपनी रस्त्यावर ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाला.- सिडको चाैकात जलवाहिनीच्या खड्ड्यात पडून राजू गायकवाड, या तरुणाचा मृत्यू झाला.- माळीवाडा पुलावर मातीऱ्या ढिगाऱ्याला धडकून आशिष सपकाळ (रा. पहाडसिंगपुरा) या तरुणाच्या मृत्यू प्रकरणात दौलताबाद ठाण्यात ठेकेदारावर गुन्हा.

वारंवार समज पण...रस्त्यांवरील कुठल्याही कामासाठी वाहतूक पोलिसांना पूर्वकल्पना देऊन एनओसी घेणे बंधनकारक आहे. त्यात वाहतूक पोलिस ठेकेदारांना कामासाठी वेळ ठरवून देतात शिवाय सूचनाफलक, सुरक्षारक्षक, बॅरिगेड्स बंधनकारक करतात. मात्र, शहरातील एकाही शासकीय कामाबाबत ठेकेदारांनी पोलिसांकडून परवानगी घेतलेली नाही. पोलिसांना न सांगताच सर्रास रस्त्यावर कुठल्याही वेळेत काम करणे, साहित्य ठेवले जातात.

कठोर भूमिका घेणाररस्त्यावरील कामासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी आवश्यक असते. आम्ही त्यानंतर आवश्यक अटी शर्थींसह परवानगी देतो, परंतु ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करत असतील, तर कठोर भूमिका घेतली जाईल.- धनंजय पाटील, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीAccidentअपघातDeathमृत्यूtraffic policeवाहतूक पोलीस