शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
2
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
3
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
4
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
5
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
6
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने
7
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
8
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

केंद्रीय कार्यालयातील अधिकारी भ्रष्ट आहेत? मग थेट सीबीआयकडे तक्रार द्या, असा करा संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 7:13 PM

उद्योजक, व्यापाऱ्यांना चक्क ‘सीबीआय’चे बैठक घेऊन आवाहन

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी कार्यालये, राष्ट्रीयकृत बँका, सार्वजनिक क्षेत्र उपक्रमात तुमचे काम होत नाही, सर्व कागदपत्रे असूनही जाणून बुजून फाइल दाबली जाते, केंद्र सरकारच्या योजनांमधील लाभार्थींकडून चिरीमिरीची मागणी होते, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)च्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखा (एसीबी) पुणेकडे ऑनलाइनवर लेखी तक्रार करा किंवा मोबाइलवर माहिती द्या, असे आवाहन केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) एसबी विभागाच्या पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप यांनी शुक्रवारी येथे केले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच सीबीआयच्या वतीने शहरात उद्योजक व व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. बैठकीत शहरातील उद्योजक, व्यावसायिकांच्या ३३ संघटना मिळून बनविलेल्या ‘टीम ऑफ असोसिएशन’च्या वतीने सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. ‘सीबीआय’बद्दल सर्वांमध्ये अनेक गैरसमज, भीती आहे. ते दूर करण्यासाठी या जनसंवाद बैठकीचे आयोजन केल्याची माहिती जगताप यांनी दिली. सीबीआयमधील एसीबी विभाग केंद्र सरकार, राष्ट्रीयकृत बँक, आयकर विभाग, केंद्रीय जीएसटी, पोस्ट खाते, सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी जर काम करण्यासाठी लाच मागत असल्यास किंवा पदाचा गैरवापर करीत असल्यास थेट सीबीआयच्या मोबाइल नंबर, दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा. घर बसल्या ई-मेल करून तक्रार द्या. त्या तक्रारीत काही तथ्य आहे का याची तपासणी करून खात्री झाल्यावर संबंधितावर चौकशी व गुन्हा दाखल केले जाईल, असे आश्वासन यावेळी जगताप यांनी दिले.

उद्योजक, व्यापाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तर दिले. यावेळी ‘सीएमआयए’चे माजी अध्यक्ष गिरिधर संघेनेरिया, प्रफुल्ल मालाणी, आदेशपालसिंग छाबडा, शिवशंकर स्वामी, सरदार हरिसिंग, जयंत देवळाणकर यांच्यासह सर्व व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी हजर होते.

‘सीबीआय’ नावामुळे सर्वच घाबरलेउद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, ‘सीबीआय’ ने बैठकीला बोलविले म्हटल्यावर आधी भीती वाटली होती. पण आजच्या बैठकीने भीती दूर झाली. केंद्रीय कार्यालयातील भ्रष्टाचारी अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार कुठे करावी माहिती नव्हते. बैठकीतून सर्व स्पष्ट झाले.

तक्रार कुठे करणारकेंद्र शासनाच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी पदाचा गैरवापर करीत आहे किंवा लाच मागत असल्यास त्याची तक्रार सीबीआयच्या एसीबी विभागाकडे ९१७५०२२२५० या मोबाइल नंबरवर किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२७६४२५०२/ २७६४२५०४ यानंबरवर संपर्क साधावा व लेखी तक्रार ईमेल-hobacpune@cbi.gov.in येथे दाखल करावी.

टॅग्स :Central Bureau of Investigationकेंद्रीय गुन्हे अन्वेषणAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीbusinessव्यवसाय