शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

आजारी आहात... टेन्शन कसले घेताय, आता १ मेपासून येतोय ‘आपला दवाखाना’

By विजय सरवदे | Published: April 28, 2023 8:26 AM

सर्वांसाठी मोफत उपचार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १४ दवाखाने

छत्रपती संभाजीनगर : आजारी आहात... काळजी करू नका. आता १ मेपासून महापालिका आणि सर्व तालुक्यांच्या ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू होत असून, तिथे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या चाचण्यांची सेवा मोफत मिळणार आहे. त्यामुळे घाटी हॉस्पिटल किंवा सरकारी रुग्णालयांच्या रांगेत तासन्तास उभे राहण्याची चिंता सोडा.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘मोहल्ला क्लिनिक’च्या धर्तीवर राज्य सरकारने राज्यात ‘आपला दवाखाना’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात असे ७०० दवाखाने सुरू करण्यात येणार असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २९ दवाखाने असतील. शहरातील झोपडपट्टी परिसर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना छोट्या- छोट्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये जावे लागते. त्यामुळे अनेकदा उपचाराला उशीर होतो, शिवाय प्रवासाचा खर्च होतो. राहण्याची गैरसोयसुद्धा होते. दुसरीकडे दैनंदिन रुग्णांमुळे घाटीसारख्या सरकारी हॉस्पिटलवर ताण वाढतो. ज्याचा थेट परिणाम अपघात विभाग, आयसीयू आणि प्रसूती विभाग, अशा तात्काळ उपचाराची गरज असलेल्या रुग्णांवर होतो. हे टाळण्यासाठी ‘आपला दवाखाना’ सुरू केला जात आहे.

कोठे असतील हे दवाखाने‘आपला दवाखाना’ ही योजना जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी १५, महापालिका क्षेत्रात १२ आणि छावणी परिसरात २, अशा एकूण २९ ठिकाणी राबविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १ मेपासून १४ दवाखाने यात महापालिका क्षेत्रात ५ आणि ग्रामीण भागात ८ दवाखाने सुरू केेले जाणार आहेत.

कोणकोणत्या सुविधा मिळणारया दवाखान्यांमध्ये बाह्यरुग्ण विभाग असणार आहे. येथे दररोज रुग्ण तपासणी केली जाणार आहे, तसेच असांसर्गिक रोग नियंत्रण कार्यक्रम, लसीकरण, माता बाल संगोपन कार्यक्रमात येणाऱ्या रोगांवर उपचार केले जातील. रक्त, लघवी यांसारख्या तपासण्याही येथे केल्या जातील.

वैद्यकीय मनुष्यबळया दवाखान्यांत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका असतील. यासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पायाभूत सुविधा, औषधांवर खर्च केला जाणार आहे, तर मनुष्यबळाचे वेतन राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा निधीतून केले जाणार आहे. यासाठी उद्या २८ एप्रिल रोजी जिल्हा आरोग्य विभाग १४ वैद्यकीय अधिकाऱ्यांची मुलाखतीद्वारे भरती करणार आहे.

दवाखान्यासाठी जागातालुक्याच्या ठिकाणी नगरपालिका, नगरपंचायतींकडे उपलब्ध इमारतीमध्ये हे दवाखाने सुरू केले जाणार आहेत, तर जिथे इमारत उपलब्ध नाही, तिथे किरायाच्या इमारतीत दवाखाने सुरू केले जाणार आहेत. तालुके व छावणी भागात या दवाखान्यांवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे, तर मनपा क्षेत्रात महापालिका आयुक्तांचे नियंत्रण असेल.

टॅग्स :doctorडॉक्टरAurangabadऔरंगाबाद