तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १.४३ लाख हेक्टर असून यापैकी १ लाख ६३ हजार ७० हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने खरिपाचे नियोजन आखले आहे. गेल्या काही वर्षांपासून कपाशीवर सातत्याने रोग पडत असल्याने उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे कपाशी लागवड करणारा शेतकरी इतर पिकांकडे वळला आहे. उत्पादन वाढविण्यासाठी विविध उपाययोजना आखताना शेतीविषयक विविध मोहीम राबवली जाणार असल्याचे कृषी अधिकारी संदीप सिरसाठ यांनी सांगितले.
खरीप पीकनिहाय पेरणी उद्दिष्ट
पीक उद्दिष्ट
कापूस ५९ ते ६० हजार हेक्टर
तूर १६ हजार हेक्टर
बाजरी ५ हजार ५०० हेक्टर
सोयाबीन १ हजार ५४९ हेक्टर