शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
3
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
4
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
5
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
6
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
7
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
8
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
9
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
10
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
11
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
12
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
13
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
14
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
15
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
16
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
17
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
18
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
19
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
20
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी

‘अर्जुना’ने शोधला ‘संकटकालीन’ मार्ग! लवकरच शिंदे गटात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 6:44 AM

दानवे यांच्याशी केला समेट; लवकरच शिंदे गटात जाणार

लोकमत न्यूज नेटवर्क    औरंगाबाद : शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आपल्यावरील ‘ईडी’चे संकट टाळण्यासाठी नवा मार्ग शोधला असून, राजकीय प्रतिस्पर्धी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी दिलजमाई केली आहे. खोतकर लवकरच शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याचे समजते.

 जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेले खोतकर यांच्यामागे रामनगर साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजार समितीसंदर्भात ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदीप्रकरणी खोतकर यांच्यावर १०० कोटी घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर ईडीच्या पथकाने खोतकर यांची चौकशी केली होती. मात्र, चौकशीतून काहीही निष्पन्न न झाल्याने ईडीने बाजार समितीवर छापा टाकून कागदपत्रांची पडताळणी केली. तसेच रामनगर साखर कारखान्याची मालमत्ता जप्त केली. खोतकर हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. सोमवारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत शिंदे यांनी दानवे-खोतकर यांच्यात समेट घडवून आणल्याचे समजते. त्यानंतरही खोतकरांनी पत्ते उघड केले नव्हते.

काय आहे नेमके प्रकरण?जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखाना कर्जबाजारी झाल्याने कारखान्याचा लिलाव करण्यात आला. खोतकर यांच्या मे. अर्जुन शुगर इंडस्ट्रीने तो ४२ कोटी ३१ लाख रुपयांत खरेदी केला. मात्र, त्यानंतर ईडीने स्वतंत्रपणे या मालमत्तेचे सर्वेक्षण केल्यानंतर या कारखान्याच्या मालमत्तेची एकूण किंमत ७८ कोटींपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले. त्यामुळे ईडीने कारखान्याची मालमत्ता जप्त केली.

संकटाच्या काळात कुणीही स्वतःला सेफ करण्याचा प्रयत्न करतो. कुटुंबाचे आणि बाकीचे अनेक तणाव असतात. पुढील निर्णय लवकरच सांगेन.- अर्जुन खोतकर

दानवेंच्या घरी चहापान : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी सकाळी खोतकर यांना दिल्ली येथील निवासस्थानी चहापानासाठी निमंत्रित केले होते. या भेटीत उभयतांमध्ये दिलजमाई घडून आल्याचे समजते.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेraosaheb danveरावसाहेब दानवे