शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सेना-भाजपत कुरघोडी; प्रशासन अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:13 AM

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सोमवारी भाजप सदस्यांनी सेनेला घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सोमवारी भाजप सदस्यांनी सेनेला घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला. औषध खरेदी, गेट खरेदी, वार्षिक नियोजनाचा आराखडा अशा अनेक विषयांवर सत्ताधारी शिवसेनेला भाजप सदस्यांनी कडाडून विरोध केला. सेना सदस्यांनी एखाद्या विषयाला हाणून पाडण्याचा प्रयत्न केला की, भाजप सदस्य त्या विषयाच्या समर्थनार्थ बाजूने उभे राहायचे. सेना सदस्य विषयाच्या बाजूने असतील, तेव्हा भाजप सदस्य तो विषय हाणून पाडण्यासाठी गोंधळ घालायचे. या दोघांच्या भांडणात मात्र प्रशासनाची अनेकदा अडचण झाली. सोमवारी दुपारी १ वाजता नियोजित सर्वसाधारण सभा सुरू होणार होती. दीड वाजला तरी अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर आणि उपाध्यक्ष केशव तायडे यांचे सभागृहात आगमन झाले नव्हते. त्यामुळे भाजप सदस्य एल. जी. गायकवाड आणि मधुकर वालतुरे यांनी सभेचा कोरम पूर्ण आहे. आपण सभा सुरू करू, अशी भूमिका घेतली व अध्यक्षपदाचे कामकाज भाजप सदस्य शिवाजी पाथ्रीकर यांना करण्यास सुचविले. तेव्हा शिवाजी पाथ्रीकर हे अध्यक्षपदाच्या खुर्चीत जाऊन बसले. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज वंदे मातरम्ने सुरु करण्याची प्रथा आहे. त्यानुसार भाजप सदस्य गायकवाड यांनी सर्वांना वंदे मातरम्साठी उभे राहण्याची विनंती केली. हा प्रकार सुरु असतानाच शिवसेनेच्या जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे काही सदस्य, अधिकाऱ्यांचे सभागृहात आगमन झाले. तरीदेखील भाजपच्या सदस्यांनी वंदे मातरम् सुरु करेंगे सुरु कर म्हणत चक्क राष्ट्रगीतच म्हणण्यास सुरुवात केली. हा प्रकार शिवसेना सदस्यांच्या लक्षात आला. राष्ट्रगीत संपल्यानंतर शिवसेनेसह काँग्रेसच्या सदस्यांनी भाजपवर राष्ट्रगीत व वंदे मातरम्चा अवमान केल्याचा आरोप केला. राष्ट्रगीत म्हटल्यामुळे सभा संपली असे जाहीर करावे लागेल, कारण सभेची सांगताच राष्ट्रगीताने केली जाते याची आठवण करून देत सेनेच्या सदस्यांनी भाजप सदस्यांना खिंडित पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भाजप सदस्यांना चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सभेचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांनी सभागृहाला विनंती केली आणि वंदे मातरम् झाल्यानंतर रीतसर सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसून राष्ट्रगीताने सभा सुरू करणाऱ्या या घटनेचा निषेध अविनाश गलांडे यांनी सभागृहात केला. त्यानंतर सेनेचे सदस्य अविनाश गलांडे, काँग्रेस सदस्य किशोर बलांडे आणि मनसे सदस्य विजय चव्हाण यांनी मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्यास कडाडून विरोध केला. १९ डिसेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चेच्या वेळेत आरोग्य केंद्र, उपकेंद्रासाठी औषधी, साधनसामग्री खरेदी करण्यास तब्बल अडीच कोटी रुपये खर्चाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. जि. प. अधिनियमानुसार असा ठराव घेता येतो का, हा विषय गंभीर आहे. तेव्हा मधुकर वालतुरे यांनी या विषयांची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती नेमावी, असा ठराव मांडण्याचा प्रयत्न केला. तो सेना व काँग्रेस सदस्यांनी हाणून पाडला. सभेचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांनी उत्तर देण्याची सभागृहाने मागणी केली. चर्चेच्या वेळेत आर्थिक बाबींविषयी ठराव घेता येतो का? हो किंवा नाही, यामध्येच उत्तर द्यावे. तेव्हा मंजूषा कापसे म्हणाल्या, अध्यक्षांच्या अधिकारावर मी भाष्य करणे योग्य होणार नाही. त्यांच्या उत्तरामुळे सदस्य अधिकच संतप्त झाले. अखेर सदस्य अविनाश गलांडे यांनी हा विषय रद्द करण्याचा ठराव मांडला.